मुंबई, 26 मे : आयपीएल 2023 आता अंतिम टप्प्यात आले असून अखेरचे दोन सामने राहिले आहेत. क्वालिफायर दोन सामन्यानंतर अंतिम सामन्यात कोणते दोन संघ असतील हे स्पष्ट होईल. आज गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याआधी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 25 मे रोजीचा असल्याचा दावा केला जात असून यात आयपीएल फायनल आणि क्वालिफायर 2 साठीच्या तिकिटासाठी स्टेडियमबाहेर उसळलेली चाहत्यांची गर्दी दिसत आहे.
तिकिटासाठी चाहत्यांची गर्दी इतकी वाढली की त्यांना रोखणं कठीण झालं. चाहत्यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना अहमदाबाद स्टेडियमच्या खराब व्यवस्थापनावर आरोप केले आहेत. एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो तुम्हाला विचलित करू शकतो. या व्हिडीओमध्ये तिकिट मिळवण्यासाठी चाहते एकमेकांवर उड्या मारताना दिसत आहेत. या धक्काबुक्कीमुळे काही चाहते जमिनीवरही पडले.
Total mismanagement in Ahmedabad for the tickets of IPL 2023 Qualifier 2 and the Final. Fans surely deserve better than this. pic.twitter.com/1T86QjhbsI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2023
आयपीएल प्लेऑफमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्ससोबत चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सने धडक मारली होती. पहिल्या क्वालिफायरमध्ये जिंकून चेन्नई थेट फायनलमध्ये पोहोचली. आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईने दहाव्यांदा धडक मारली असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ आहे.
एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊला 81 धावांनी धूळ चारली. आता मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ फायनलमध्ये चेन्नईविरुद्ध खेळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023