स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020: KKR च्या खराब कामगिरीवर चाहत्याचा प्रश्न, शाहरुखने दिलं मनातलं उत्तर

IPL 2020: KKR च्या खराब कामगिरीवर चाहत्याचा प्रश्न, शाहरुखने दिलं मनातलं उत्तर

KKRच्या कामगिरीबद्दल शाहरुख खान (Shah Rukh Khan)ला एका चाहत्याने प्रश्न विचारला. किंग खाननेही त्याला भन्नाट उत्तर दिलं.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Ruk Khan) प्रेस आणि त्याच्या चाहत्यांना अनेकदा हास्यदपद उत्तरं देतो. ट्विटरवर एका व्यक्तीने एसआरके (SRK)ला विचारले की, "केकेआर IPLचा हा सिझन जिंकेल की नाही?, हा संघ क्रिकेट खेळत नाही तर चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहे. त्याला उत्तर देताना अभिनेता म्हणाला, "अर्रर्र, माझा विचार करा, माझ्या हृदयाला किती वेदना होत असतील! "

शाहरुखने नुकतच सोशल मीडियावर 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन केलं होतं. यादरम्यान त्याला हा प्रश्न विचारण्यात आला. इयन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने आतापर्यंत फॅन्सच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. मागील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पराभूत झाल्यानंतर ते आयपीएल 2020 गुणांच्या टेबलमध्ये चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर घसरले आहेत. हा संघ अजूनही प्लेऑफसाठी पात्र नाही आणि आयपीएल 2020 मध्ये पुढे राहण्यासाठी केकेआरला उर्वरित सर्व सामने जिंकण्याची गरज आहे. त्यांनी आतापर्यंत स्पर्धेत खेळलेल्या 12 पैकी केवळ 6 सामने जिंकले आहेत.

मागील सामन्यात पंजाबने केकेआरचा जोरदार पराभव करत त्यांना धक्का दिला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने स्कोअरबोर्डवर 149 धावांचा लक्ष्य पंजाबसाठी उभं केलं. किंग्ज इलेव्हन पंजाबने आरामात बॅटिंग करून 18.5 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पार केलं. मनदीपसिंग आणि ख्रिस गेल या जोडीने प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळवला. सिंगने नाबाद 66 धावा केल्या तर गेलने 51 धावा केल्या.

केकेआरची टीम खेळातील फॉर्मच्या समस्येवर काम करत आहे. काही सामन्यात काही फलंदाज कामगिरी करतात तर काही गोलंदाजांनी त्यांना विजय मिळवून देण्यात मदत केली आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या कोणत्याही खेळाडूने आतापर्यंत स्पर्धेत आपला फॉर्म दर्शवलेला  नाही. उर्वरित 2 सामन्यांमध्ये केकेआर कशी कामगिरी करेल हे पहावं लागेल.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 28, 2020, 11:07 PM IST

ताज्या बातम्या