0,0,9..विराटच्या खराब फॉर्मवर RCB चा कॅप्टन डुप्लेसिसने सोडले मौन, म्हणाला...
0,0,9..विराटच्या खराब फॉर्मवर RCB चा कॅप्टन डुप्लेसिसने सोडले मौन, म्हणाला...
Virat Kohli in IPL 2022
आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) लागोपाठ 2 वेळा गोल्डन डकवर आऊट झाल्यानंतर राजस्थानविरुद्धच्या (RCB vs RR) सामन्यात विराट कोहलीपुढे (Virat Kohli) तिसऱ्यांदा पहिल्या बॉलवर आऊट न होण्याचं आव्हान होतं. हे आव्हान विराटने यशस्वीरित्या पार पाडलं, पण त्याला मोठा स्कोअर करण्यात पुन्हा अपयश आलं.
पुणे, 27 एप्रिल: आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) लागोपाठ 2 वेळा गोल्डन डकवर आऊट झाल्यानंतर राजस्थानविरुद्धच्या (RCB vs RR) सामन्यात विराट कोहलीपुढे (Virat Kohli) तिसऱ्यांदा पहिल्या बॉलवर आऊट न होण्याचं आव्हान होतं. हे आव्हान विराटने यशस्वीरित्या पार पाडलं, पण त्याला मोठा स्कोअर करण्यात पुन्हा अपयश आलं. खरंतर या सामन्यात विराटला नशिबानेही पाच वेळा साथ दिली, पण या संधींचं त्याला सोनं करता आलं नाही. त्याच्या या अपयशी खेळीनंतर क्रिकेट जगतातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. अशातच, आरसीबीचा कॅप्टन डुप्लेसिसने विराटच्या खराब फॉर्मवर मौन सोडले आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहली सलग दोन सामन्यांमध्ये 'गोल्डन डक'चा बळी ठरला होता. म्हणजेच दोन्ही सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होऊन तो पॅव्हेलियनमध्ये परतला आणि आता तो राजस्थानविरुद्ध 9 धावांवर बाद झाला.
सामन्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसला त्याच्या खराब कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज म्हणाला, "महान खेळाडू याआधीही अशा टप्प्यांतून जात आहेत. त्याने बाहेर बसून खेळाबद्दल बोलावे अशी आमची इच्छा नाही. "विचार करा. हा संपूर्ण खेळ आत्मविश्वासाचा आहे. अशी प्रतिक्रिया डुप्लेसिसने यावेळी दिली.
…तेव्हा आम्हाला रोखणे कठीण होईल’, KKR च्या कॅप्टन अय्यरचे मोठे वक्तव्य
विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्याच्या जागी आरसीबीचा कर्णधार बनलेल्या फाफ डू प्लेसिसने आपल्या विधानाने इतके स्पष्ट केले आहे की तो किंवा संघ व्यवस्थापन स्वतः विराटला संघाबाहेर टाकणार नाही. यावेळी काही सामन्यांचा ब्रेक घेतल्यानंतर पुनरागमन करायचे की नाही हा निर्णय विराट कोहली स्वत: घेईल.
आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीची (RCB vs RR) हाराकिरी सुरूच आहे. हैदराबादविरुद्ध 68 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध 145 रनचं आव्हान पार करणंही आरसीबीला शक्य झालं नाही. 19.3 ओव्हरमध्ये 115 रनवरच आरसीबी ऑल आऊट झाली.
IPL 2022 मधील विराट कोहलीची आतापर्यंतची खेळी
1. पंजाब विरुद्ध - 41* धावा
2. कोलकाता विरुद्ध - 12 धावा
3. राजस्थान विरुद्ध - 5 धावा
4. मुंबई विरुद्ध - 48 धावा
5. चेन्नई विरुद्ध - 1 धाव
6. दिल्ली विरुद्ध - 12 धावा
7. लखनौ विरुद्ध - 0 धावा
8. हैदराबाद विरुद्ध - 0 धावा
9. राजस्थान विरुद्ध (दुसरा लेग) - 9 धावा
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.