...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा

...तेव्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली, डुप्लेसिसचा खळबळजनक खुलासा

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसने (Faf du Plessis) खळबळजनक खुलासा केला आहे. मला आणि माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असं डुप्लेसिस म्हणाला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसने (Faf du Plessis) खळबळजनक खुलासा केला आहे. मला आणि माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, असं डुप्लेसिस म्हणाला आहे. 2011 सालच्या वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup 2011) दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडविरुद्धच्या (South Africa vs New Zealand) क्वार्टर फायनलमध्ये 49 रनने पराभव झाला होता. यानंतर डुप्लेसिस आणि त्याच्या पत्नीला सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

क्वार्टर फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 222 रनचं आव्हान दिलं होतं, पण आफ्रिकेचा 40 बॉल आधीच 172 रनवर ऑल आऊट झाला. ढाकाच्या मीरपूरमध्ये शेर ए बांगला स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या फाफ डुप्लेसिसने 43 बॉलमध्ये 36 रनची खेळी केली होती.

क्रिकइन्फोशी बोलताना डुप्लेसिस म्हणाला, 'त्यावेळी मला आणि पत्नीला सोशल मीडियावरून धमकी देण्यात आली. या गोष्टी खूप वैयक्तिक झाल्या होत्या, काही गोष्टी आपत्तीजनक होत्या, पण मला त्या परत सांगायच्या नाहीत. सगळे खेळाडू यातून जातात.'

क्वार्टर फायनलमध्ये डुप्लेसिस जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 27.4 ओव्हरमध्ये 121 रन करून 4 विकेट गमावल्या होत्या. एबी डिव्हिलियर्स 35 रनवर आऊट झाला, तर डुप्लेसिस 43 व्या ओव्हरमध्ये माघारी परतला. डुप्लेसिसची विकेट गेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या तळाच्या एकाही बॅट्समनला दोन आकडी धावसंख्या उभारता आली नाही आणि टीम वर्ल्ड कपच्या बाहेर गेली.

Published by: Shreyas
First published: May 18, 2021, 8:58 PM IST

ताज्या बातम्या