Fact Check : महेंद्रसिंग धोनी उतरणार निवडणुकांच्या रिंगणात? वाचा काय आहे सत्य

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ऑगस्ट 2018ला धोनीची भेट घेतली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 08:41 AM IST

Fact Check : महेंद्रसिंग धोनी उतरणार निवडणुकांच्या रिंगणात? वाचा काय आहे सत्य

नवी दिल्ली, 5 एप्रिल : लोकसभा निवडणुकांचे ज्वर वाढत असताना, रोज नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू असते. त्यात आता अभिनेते, अभिनेत्री आणि खेळाडू यांचाही समावेश झाला आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर भारताचा माजी कर्णधार, फिनिशर महेंद्रसिंह धोनी हा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर धोनी भाजपकडून निवडणुक लढणार आहे, अश्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. पण हे यात तथ्य नाही, या सगळ्या पोस्ट खोट्या असल्याती माहिती आता समोर आली आहे.

वाचा : 'धोनी जग आहे माझं' मुंबईच्या मैदानावर तरुणीचा फोटो व्हायरल

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना, सोशल मीडियावरही जोरदार प्रचार सुरू असतो, यातच फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये धोनी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या फोटो आहे. दरम्यान या फोटोखाली, महेंद्रसिंह धोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच ते निवडणूकीत उभे राहतील. तुम्ही माहीचे स्वागत करणार नाही का? असा मजकूर लिहण्यात आला होता. मात्र हा फोटो ऑगस्ट 2018चा असल्याची माहिती आता समोर आली आहे.

गेल्यावर्षी अमित शाह समर्थनासाठी संपर्क या अभियानाकरिता धोनीच्या घरी गेले होते. मात्र हा फोटो सोशल मीडियावर आता पोस्टकरून, धोनी निवडणूक लढवणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. धोनीचे मॅनेजर आणि मित्र अरुण पांडे यांनी या पोस्टचे खंडन करत, ‘’धोनी राजकारणात प्रवेश करणार नाही. तो सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. त्यानंतर धोनी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात सामिल होणार आहे’’, अशी माहिती दिली.

Loading...

सध्या धोनी आयपीएलमध्ये चेन्नई संघाचा कर्णधार असून, तीन वेळा विजेतेपद जिंकलेला धोनीचा संघ यंदाही आयपीएल जिंकण्यास सज्ज आहे.


सैराट ते कागर, मेकओव्हरनंतरची 'आर्ची'ची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 08:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...