World Cup : ‘या’ खेळाडूला डावलण्याचा निर्णय विराट कोहलीला भोवणार ?

World Cup : ‘या’ खेळाडूला डावलण्याचा निर्णय विराट कोहलीला भोवणार ?

वर्ल्ड कपच्या संभाव्य संघात चौथ्या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार असताना या खेळाडूला संघात जागा न मिळाल्यानं सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, दि. 15 एप्रिल : ग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यात मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू यांना डच्चू देत केदार जाधव आणि विजय शंकर यांना संघात जागा देण्यात आली.

दरम्यान, वर्ल्ड कपच्या संभाव्य संघात चौथ्या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार असलेल्या अंबाती रायडूला आणि रिषभ पंतला संघात जागा न मिळाल्यानं सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का बसला आहे. अंबाती रायडूनं 2013 साली भारताकडून पर्दापण केलं होतं. त्यानंतर त्यानं भारताकडून 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र असं असूनही केवळ 7 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या विजय शंकर या अष्टपैलु खेळाडूची वर्णी भारतीय संघात लागली.

यामुळं माजी क्रिकेटपटू, क्रिकेट विश्लेषक आणि चाहत्यांनी निवड समितीच्या या संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मधल्या फळीसाठी कोणताच खेळाडू अनुभवी नसल्यामुळं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार कोण, हा प्रश्न कायम आहे. दरम्यान निवड समितीचे अध्यक्ष एसएमके प्रसाद यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अंबाती रायडूच्या नावाचा उल्लेखही केला नाही.

रायडूच्या एकदिवसीय क्रिकेटमधली सरासरी पाहिली तर, आपल्या लक्षात येईल की, अंबाती रायडूला वगळण्याचा हा निर्णय विराट कोहलीला आणि निवड समितीला महागात पडणार आहे. भारतासाठी सगळ्यात जास्त सरासरी असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अंबाती रायडूचा चौथा क्रमांक आहे. त्यानं 47.05च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तर, प्रथम क्रमांकावर 59.57नं धावा करणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा क्रमांक लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे, रायडूनं सचिन पेक्षा जास्त सरासरीनं धावा केल्या आहेत.

यावर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी, वर्ल्ड कप संघात जागा न मिळाल्यानं रायडू दु:खी झाला असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी त्यानं प्रथम श्रेणीत खेळणे सोडून दिले होतं, असं मत व्यक्त केलं.

आकाश चोप्रानंही निवड समितीच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक.

VIDEO : राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांची मिमिक्री!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading