प्रसिद्ध खेळाडूनं पत्नी आणि 3 मुलांना कारमध्ये बंद करून जिवंत जाळलं, नंतर केली आत्महत्या

प्रसिद्ध खेळाडूनं पत्नी आणि 3 मुलांना कारमध्ये बंद करून जिवंत जाळलं, नंतर केली आत्महत्या

खेळ लोकांना बरोबर आणि चुकीच्या गोष्टींमधला फरक शिकवतो. पण याला साफ खोटं ठरवत एका दिग्गज खेळाडून असं काही केलं त्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

ब्रिसबेन, 20 फेब्रुवारी : असं म्हटलं जातं की एखाद्या खेळातमध्ये असणारी दिग्गज मंडळी ही त्यांच्या खासगी आयुष्यात नियमांचं कठोर पालन करणारी असतात. खेळ लोकांना बरोबर आणि चुकीच्या गोष्टींमधला फरक शिकवतो. पण याला साफ खोटं ठरवत एका दिग्गज खेळाडून असं काही केलं त्यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध खेळाडूने पत्नी आणि 3 मुलांना कारमध्ये बंद करून जिवंत जाळलं आणि त्यानंतर स्वत:देखील आत्महत्या केली.

ऑस्ट्रेलियाच्या रग्बी खेळाडू रोवन बॅक्सटर (Rovan Baxter) आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नी आणि तीन मुलांना जिवंत जाळलं. या  घटनेमुळे क्रिडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. हॅना असं रोवनच्या पत्नीचं नाव आहे.

कारला लावलेल्या आगीत तीन मुलांसह पत्नीचा मृत्यू

कारला लागलेल्या आगीत तीन मुलांसह हॅना यांचा मृत्यू झाला. ब्रिस्बेनच्या कॅम्प हिल भागात सकाळी साडेआठच्या दरम्यान स्फोटानंतर अचानक आरडाओरडा झाला. जेव्हा लोक बाहेर आले त्यांनी पाहिले की, रोवनची पत्नी हॅना(Hannah Baxter), त्यांची तीन मुले, सहा वर्षाची लायना, चार वर्षांची आलिया आणि तीन वर्षाचा ट्रे कारमध्ये आगीत अडकलेला होता. त्याचवेळी कारच्यासमोर रोवन याचा मृतदेहदेखील होता. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आला होता. लोकांनी जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला आणि हॅना आणि मुलांना रुग्णालयात नेले. पण, चौघांचाही यामध्ये मृत्यू झाला.

पत्नी हॅना आणि 3 मुलांसोबत होते रोवन बॅक्सटर

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारला आग लागल्यामुळे अचानक स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिलं तेव्हा कारला आग लागली होती. त्यानंतर आग विझवून हॅनाला कारच्या बाहेर काढलं तेव्हा तिने ओरडण्यास सुरुवात केली आणि म्हणाली 'त्याने माझ्यावर पेट्रोल टाकलं'.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅना ड्रायव्हिंग सीटवर बसली होती आणि रोवन कारच्या बाहेर येण्याआधी पुढच्या सीटवर बसला होता. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हॅना बेक्सटर तिच्या 3 मुलांसोबत होती

माजी रग्बी खेळाडू रोव्हन बेक्सटर आणि त्याची पत्नी गेल्या वर्षी वेगळे झाले होते. यानंतर दोघांच्यात मुलांच्या ताब्यात घेण्याबाबत वाद झाला. रोवन एनबीएलमध्ये न्यूझीलंड वॉरियर्सकडून खेळला. ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघ व्यतिरिक्त तो एनबीएलमध्ये न्यूझीलंड वॉरियर्सकडूनही खेळला. यापूर्वी तो न्यूझीलंड रग्बी लीगमध्ये बे ऑफ पँलेंटमध्येही खेळला आहे.

First published: February 20, 2020, 10:45 AM IST
Tags:

ताज्या बातम्या