• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • फिक्सिंगमुळे जेलमध्ये गेलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार अंपायर!

फिक्सिंगमुळे जेलमध्ये गेलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू होणार अंपायर!

पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) 2010 साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. या कारणामुळे त्याला जेलची हवादेखील खायला लागली होती. तसंच त्याच्यावर 10 वर्षांची बंदीही घालण्यात आली होती. पण आता सलमान बट भविष्यात मैदानात अंपायर म्हणून दिसू शकतो.

 • Share this:
  लाहोर, 29 जून : पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) 2010 साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. या कारणामुळे त्याला जेलची हवादेखील खायला लागली होती. तसंच त्याच्यावर 10 वर्षांची बंदीही घालण्यात आली होती. पण आता सलमान बट भविष्यात मैदानात अंपायर म्हणून दिसू शकतो. पीसीबीने (PCB) आयोजित केलेल्या ऑनलाईन लेव्हल-1 अंपायरिंग कोर्समध्ये सलमान बट सामील झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मॅच अधिकारी तयार करण्यासाठी याचं आयोजन करत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 7 ते 25 जूनपर्यंत आयोजित केलेल्या अंपायरिंग आणि मॅच अधिकाऱ्यांच्या कोर्समध्ये 346 जण सहभागी झाले होते. सलमान बटशिवाय अब्दुल रौफ, बिलाल आसीफ आणि शोएब खानही या कोर्समध्ये होते. पीसीबीकडून लेव्हल-1, लेव्हल-2 आणि लेव्हल-3 कोर्सचं आयोजन करण्यात येणार आहे. यातल्या पहिल्या सत्राचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं. इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्सिंग ऑगस्ट 2010 साली लॉर्ड्स टेस्टमध्ये तीन क्रिकेटपटूंनी सट्टेबाज मजहर माजीदसोबत स्पॉट फिक्सिंग केली. टेस्ट मॅचमध्ये कर्णधार सलमान बट याच्या सांगण्यावरून मोहम्मद आसीफ (Mohammad Asif) आणि मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) नो बॉल टाकले होते. या स्टिंग ऑपरेशनने क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती. या प्रकरणी खेळाडूंना जेलमध्येही जावं लागलं. बंदीनंतर मोहम्मद आमीरने मैदानात पुनरागमन केलं यानंतर आता त्याने निवृत्तीही स्विकारली, तर मोहम्मद आसीफला मैदानात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. कोहलीची उडवली खिल्ली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर सलमान बटने विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. तुम्ही चांगले कर्णधार असाल, पण तुम्हाला ट्रॉफी जिंकता येत नसेल, तर तुम्हाला लोक लक्षात ठेवणार नाहीत, असं बट म्हणाला होता. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक 36 टेस्ट जिंकल्या.
  Published by:Shreyas
  First published: