या दिग्गज क्रिकेटपटूला त्वचेचा कॅन्सर; सोशल मीडियावर केलं भावनिक आवाहन!

या दिग्गज क्रिकेटपटूला त्वचेचा कॅन्सर; सोशल मीडियावर केलं भावनिक आवाहन!

तुमच्या त्वचेची काळजी घ्या आणि सूर्य किरणांपासून स्वत:ची काळजी घ्या, हे आवाहन कोण डॉक्टरांनी नव्हे तर एका क्रिकेटपटूने केले आहे.

  • Share this:

सिडनी, 10 सप्टेंबर: तुमच्या त्वचेची काळजी घ्या आणि सूर्य किरणांपासून स्वत:ची काळजी घ्या, हे आवाहन कोण डॉक्टरांनी नव्हे तर एका क्रिकेटपटूने केले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज फलंदाजांमध्ये समावेश होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने सोशल मीडियावर स्किन कॅन्सर (Skin Cancer) झाल्याचे सांगितले. पोस्टमध्ये या खेळाडूने एक भावनिक आवाहन देखील केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क (Michael Clarke) त्वचेच्या कॅन्सरशी लढतोय. काही दिवसांपूर्वीच त्याने कपाळावरील कॅन्सरवर उपचार घेतले होते. एकेकाळच्या ऑस्ट्रेलियाचा सर्वात भरवश्याचा फलंदाज असलेल्या मायकलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्या कपाळावरील टाके दिसत आहेत. फोटो शेअर करताना मायकलने एक भावनिक आवाहन देखील केले आहे. युवकांनी स्वत:च्या त्वचेची काळजी घ्यावी. सुर्याच्या किरणांपासून योग्य तो बचाव करावा, असे देखील मायकलने म्हटले आहे. मायकलच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू ग्राँट हॅकेट आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शहजाद यांनी कंमेंट केली आहे. हॅकेट म्हणतो की, तुमची ही पोस्ट वाचून मला डॉक्टरांना भेट घ्यावी लागली. तर शहजादने मायकलचा उल्लेक लिंजड असा केला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना मायकलने कसोटीमध्ये 28 शतकांसह 8 हजार 643 धावा केल्या आहेत. कसोटीत 329 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. तर वनडे मध्ये त्याने 8 शतके आणि 7 हजार 981 धावा केल्या आहेत. 7news.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार 2006मध्ये मायकलला त्वचेचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याने उपचार घेण्यास सुरुवात केली. 2010पासून तो कॅन्सर काऊसिलचा ब्राँड अॅबेसिडर आहे. मायकल क्लार्कने 2011मध्ये रिकी पॉन्टिंगकडून कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली होती. क्लार्कने ऑस्ट्रेलियाकडून 115 कसोटी, 245 वनडे आणि 34 टी-20 सामने खेळले आहेत. 2015च्या अॅशेस मालिकेनंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

दोनच महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल यांनी देखील त्वचेचा कर्करोग असल्याचे सांगितले होते.

VIDEO : वंचितकडून जातीयवादी पक्षाला मदत, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Published by: Akshay Shitole
First published: September 10, 2019, 10:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading