• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवलं तर Team Indiaला बसणार मोठा धक्का

न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवलं तर Team Indiaला बसणार मोठा धक्का

Team India

Team India

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवारी होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करणे गरजेचे आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाच सेमीफायनलचे (India in semifinal) तिकीट अफगाणिस्तानच्या हातात आहे. रविवारी होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (AFG vs NZ) या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करणे गरजेजे आहे. अफगाणिस्तानच्या विजयात भारताचा विजय आणि पराभवात भारताचा पराभव अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेंमीच्या नजरा अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याकडे वळले आहेत. स्कॉटलंडला मात दिल्यानंतर भारत 2 विजयांसह 4 गुण घेऊन तिसऱ्या स्थानावर गेला आहे. नेट-रनरेटच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला मागे टाकलं आहे. तसं पाहायाला गेलं तर भारताचा रनरेट पाकिस्तान आणि न्यूझीलंडपेक्षाही अधिक आहे. पण पाकिस्तान 4 पैकी 4 सामने जिंकत याआधीच पुढील फेरीत पोहोचला आहे. न्यूझीलंडनेही 3 सामने जिंकल्याने तो भारताच्या पुढे आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ जर त्यांचा सुपर 12 मधील शेवटचा सामना अफगाणिस्ताविरुद्ध पराभूत झाला तर तो केवळ 3 विजयासंह गुणतालिकेत राहिल. ज्यानंतर भारतही नामिबीयाला नमवून न्यूझीलंड इतकेच विजय मिळवून गुणतालिकेत असेल. अशावेळी अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंड तिन्ही संघ तीन विजयांसह गुणतालिकेत असल्यास उत्तर रनरेटच्या जोरावर टीम इंडिया पुढील फेरीत जाईल. पण या सर्वासाठी मूळात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला मात देणे गरजेचे आहे.

  अफगाणिस्तानच्या फलंदाजांसमोर किवींचे आक्रमक आव्हान

  किवी संघाकडे मजबूत बॉलर आहेत. जे अफगाणिस्तानच्या फलंदाजांसाठी अडचणीचे ठरेल. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आपल्या फिरकी गोलंदाजांच्या जोरावर आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या फलंदाजांना मात्र आता ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेले फिरकीपटू इश सोधी आणि मिचेल सँटनर यांच्याशी सामना करावा लागणार आहे. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना आज चांगली धावसंख्या उभारावी लागणार असून, त्यानंतर राशिद खानच्या नेतृत्वाखालील गोलंदाज बाजू पलटू शकतात. मुजीब उर रहमानच्या दुखापतीमुळे अफगाण संघाचे गोलंदाजी आक्रमण निश्चितच कमकुवत झाले आहे, परंतु फिरकीविरुद्ध किवी गोलंदाजांच्या कमकुवतपणाचा फायदा ते घेऊ शकतात.
  Published by:Dhanshri Otari
  First published: