मुंबई, 28 एप्रिल : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) हा निवृत्तीनंतरही कायम चर्चेत असतो. एखाद्या मॅचवर किंवा क्रिकेटमधील कोणत्याही घटनेवर तो सोशल मीडियावर कायम प्रतिक्रिया देत असतो. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील मालिकेच्या दरम्यानही तो त्याच्या ट्विट्समुळे चर्चेत होता. त्यावेळी त्यानं अनेकदा हिंदीमध्येही ट्विट्स केले होते.
सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतही तो सक्रीय आहे. टी20 क्रिकेट हा पीटरसनचा आवडता प्रकार असल्यानं त्याबाबत तो कायम मत प्रदर्शित करत असतो. आयपीएल स्पर्धेत स्लो ओव्हर रेटमुळे काही कॅप्टनना दंड झाल्यानंतर त्यानं आनंद व्यक्त केला होता. क्रिकेटच्या या सर्वात जलद प्रकारात कोणताही संथपणा नको, अशी भूमिका पीटरसननं मांडली होती.
आता पीटरसननं क्रिकेटचं नियमन करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) समोर एक अभिनव प्रस्ताव मांडला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये एखाद्या बॅट्समननं 100 मीटर पेक्षा लांब सिक्स मारला तर त्याला 6 पैकी 12 रन मिळावेत, अशी मागणी पीटरसननं केली आहे. त्याचबरोबर त्यानं आपल्या या प्रस्तावाचे फायदे देखील ट्विट करुन सांगितले आहेत.
काय आहेत फायदे?
पीटरसनच्या मते एका बॉलवर 12 रन मिळणार असतील तर कोणतीही टी20 मॅच शेवटपर्यंत संपणार नाही. त्यामुळे मॅचमधील थरार शेवटपर्यंत कायम राहील. तसंच ब्रॉडकास्टर्सनाही याचा फायदा होईल. यामुळे महसूल निर्मितीचा नवा मार्ग उपलब्ध होईल,'' असा दावा पीटरसननं केला आहे.
I want an addition to the rules in T20 cricket! Or, @englandcricket can do it in the 100.
If a player hits a 6 that goes over 100m, I want a 12 awarded! @ICC — Kevin Pietersen (@KP24) April 27, 2021
The pluses for a 12, for a shot that travels over 100m: 1. No game is really over till it’s over. 2. It adds real excitement. 3. Broadcasters have new equations around possibilities of 12s being hit. 4. New revenue stream as they can be sponsored.
Watch this space...! — Kevin Pietersen (@KP24) April 27, 2021
मुंबई इंडियन्स नाही तर ही टीम जिंकणार स्पर्धा! रवी शास्त्रींचा सूचक इशारा
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या 'द हंड्रेड' या स्पर्धेत हा नियम लागू करावा अशी मागणी पीटरसननं केली आहे. तसंच त्यानं या ट्विटमध्ये आयसीसीला देखील टॅग केलं आहे. पीटरसनटची ही मागणी प्रत्यक्षात आली तर क्रिकेटचे स्वरुप आणखी बदलणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.