• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • तब्बल 6 वर्षांनंतर इंग्लिश खेळाडूला आली अक्कल, Cheteshwar Pujaraची मागितली माफी, काय आहे कारण?

तब्बल 6 वर्षांनंतर इंग्लिश खेळाडूला आली अक्कल, Cheteshwar Pujaraची मागितली माफी, काय आहे कारण?

Cheteshwar Pujara

Cheteshwar Pujara

भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा(Cheteshwar Pujara) 2015 मध्ये त्याच्या कठीण नावामुळे इंग्लंडमध्ये थट्टेचा बळी ठरला होता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा(Cheteshwar Pujara) 2015 मध्ये त्याच्या कठीण नावामुळे इंग्लंडमध्ये थट्टेचा बळी ठरला होता. त्यानंतर यॉर्कशायर काउंटी संघाकडून खेळताना पुजाराला सहकारी खेळाडू त्याचे खरे नाव न उच्चारता स्टीव्ह या नावाने हाक मारत. आता तब्बल 6 वर्षांनंतर आपली चुक लक्षात आली असता पुजाराचा साथीदार असलेला इंग्लिश क्रिकेटर जॅक ब्रूक्सने (Jack Brooks) याबद्दल त्याची माफी मागितली आहे. ब्रूक्सने एका निवेदनात आपली चूक मान्य केली आहे. होय पुजारासोबत असे घडले. आम्ही आडनावे त्यांच्या पंथाची, वंशाची पर्वा न करता देत होतो. माझ्याकडूनही ही चूक झाली आहे. मला ते मान्य आहे. असे करणे अपमानास्पद आणि चुकीचे होते. मी चेतेश्वरशी संपर्क साधला. त्याची आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागतो. मी त्याला सांगितले की माझ्यामुळे त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला दुखावले असेल तर मी माफी मागतो. तेव्हा हे जातीय वर्तन आहे हे मला माहीत नव्हते, पण आज मी मानतो की ते सहन करण्यासारखे नव्हते.

  म्हणून पुजाराला स्टीव्ह नावाने हाक मारत

  इंग्लिश क्रिकेटपटूंना 'चेतेश्वर पुजारा' म्हणणे खूप अवघड होते आणि त्यांना हे नाव उच्चारता येत नव्हते.

  या वादग्रस्त ट्विटबद्दल ब्रूक्सने माफीही मागितली होती

  याशिवाय 2012 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्विटबद्दलही ब्रूक्सने माफी मागितली होती.  तो म्हणाला, "मी कबूल करतो की 2012 मध्ये माझ्या दोन ट्विटमध्ये वापरलेली भाषा अस्वीकार्य होती आणि मला ती वापरल्याबद्दल मनापासून खेद वाटते. मी त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो. मी ज्या दोन खेळाडूंना ट्विट केले ते माझे मित्र आहेत आणि मला असे म्हणायचे नव्हते. त्यांना त्रास द्यायाचा नव्हता."
  Published by:Dhanshri Otari
  First published: