Home /News /sport /

END vs IND : ज्या रन आऊटने पलटली मॅच, त्यावरुनच सुरू झाला वाद

END vs IND : ज्या रन आऊटने पलटली मॅच, त्यावरुनच सुरू झाला वाद

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय महिला टीमचा (India Women vs England Women) 8 रनने रोमांचक विजय झाला. उत्कृष्ट फिल्डिंगच्या जोरावर भारताने इंग्लंडच्या 4 खेळाडूंना रन आऊट केलं, पण यातल्या एक रन आऊटवरुन आता वाद निर्माण झाला आहे.

पुढे वाचा ...
    लंडन, 12 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय महिला टीमचा (India Women vs England Women) 8 रनने रोमांचक विजय झाला. भारताने ठेवलेल्या 149 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 140 रनच करता आल्या. भारताकडून पूनम यादवने (Poonam Yadav) सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण ओपनर शफाली वर्माने (Shafali Varma) इंग्लंडच्या बॉलरवर आक्रमण केलं. स्मृती मंधना (Smriti Mandhana) आणि शफाली यांच्यात 70 रनची पार्टनरशीप झाली. शफालीने या सामन्यात 38 बॉलमध्ये 48 रन केले, यात 8 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. स्मृती मंधना 20 रनवर आऊट झाली, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 31 रन, दीप्ती शर्माने नाबाद 24 रन, रिचा घोषने 8 रन आणि स्नेह राणाने नाबाद 8 रन केले. या विजयासोबतच भारताने तीन टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी करत पुनरागमन केलं. 14 ओव्हरमध्ये 106/2 अशी इंग्लंडची अवस्था होती, पण 20 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोअर 140/8 एवढाच झाला, याला प्रमुख कारण ठरलं भारताची फिल्डिंग. उत्कृष्ट फिल्डिंगच्या जोरावर भारताने इंग्लंडच्या 4 खेळाडूंना रन आऊट केलं, पण यातल्या एक रन आऊटवरुन आता वाद निर्माण झाला आहे. इंग्लंड टीमची कर्णधार हिथर नाईटला (Heather Knight) दीप्ती शर्माने (Deepti Sharma) रन आऊट केलं, यावर आक्षेप घेण्यात येत आहेत. दीप्तीने रन आऊट केलं तेव्हा हिथर नॉन स्ट्रायकर एण्डला परत येत होती, पण तेव्हा मध्ये दीप्ती शर्मा बॉल अडवण्यासाठी आली, ज्यामुळे हिथरला क्रीजमध्ये बॅट ठेवता आली नाही. तेव्हाच बॉल स्टम्पला लागला आणि भारतीय टीमने रन आऊटसाठी अपील केलं, यानंतर हिथरला आऊट देण्यात आलं. आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार खेळाडू मध्ये जाणून बुजून आला का मुद्दाम, हे ठरवण्याचा अधिकार मैदानातल्या अंपायरना आहे. जर खेळाडू जाणून बुजून मध्ये आला असेल, तर त्याला नॉट आऊट दिलं जातं, याचा निर्णय अंपायर घेतो. दीप्ती शर्माच्या या कृतीला ऑबस्ट्रक्शन ऑन फिल्ड मानण्यात आलं नाही, त्यामुळे हिथर नाईटला आऊट देण्यात आलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england, Team india

    पुढील बातम्या