Elec-widget

क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो; म्हणाली, कम्फर्टेबल नव्हते तरीही गर्व आहे

क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो; म्हणाली, कम्फर्टेबल नव्हते तरीही गर्व आहे

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू सारा टेलरनं तिचा न्यूड फोटो शेअऱ केला असून तिनं महिलांना संदेशही दिला आहे.

  • Share this:

लंडन, 14 ऑगस्ट : इंग्लंडची महिला क्रिकेटर सारा टेलर तिच्या खेळानं मैदान गाजवते. आता तिच्या एका न्यूड फोटोची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सारानं महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृतीसाठी एक फोटो काढला असून त्यासोबत संदेश दिला आहे. यामुळं तिचं कौतुक होत आहे.

सारा टेलर सध्या जगभरात सुरू असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांशी संबंधित अभियानांतर्गत काम करते. तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिनं म्हटलं आहे की, न्यूड फोटो काढताना मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. तरीही मी या अभियानात सहभागी असल्याचा अभिमान वाटत आहे असं साराने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून तिनं नाव मागे घेतलं होतं. मानसिक तणावातून दूर होण्यासाठी सारानं काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्यण घेतला आहे.

सारानं दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, प्रत्येक मुलीला तिच्या शरिराचा अभिमान असायला हवा. जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की हा माझा कम्फर्ट झोन नाही. तरीही मला अभिमान वाटत आहे की womenshealthuk च्या अभियानात मी सहभागी आहे. नेहमीच माझ्या शरिराच्या काही समस्या जाणवल्या आहेत. त्या सोडवण्याच्या निमित्ताने या अभियानाचा भाग होता आलं. प्रत्येक मुलगी सुंदर दिसते आणि लक्षात ठेवा प्रत्येक महिला सुंदर असते असंही सारा म्हणाली.

Loading...

इंग्लंडकडून सारानं आतापर्यंत 10 कसोटी खेळल्या आहेत. यात तिला 300 धावा करता आल्या. कसोटीत तिची सर्वोच्च धावसंख्या 40 आहे. याशिवाय 126 एकदिवसीय सामने खेळताना तिनं 4 हजार 56 धावा केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 20 अर्धशतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिनं 147 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्येही तिनं 90 सामने खेळले आहेत. यात 29.02 च्या सरासरीनं 2 हजार 177 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 77 धावांची खेळी केली आहे.

यष्टीरक्षण करताना सारानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 87 झेल आणि 51 यष्टीचित केलं आहे. तर कसोटीत 18 झेल आणि दोन यष्टीचित केले आहेत. टी20मध्ये तिने 23 झेल घेताना 51 फलंदाजांना यष्टीचित केलं आहे.

असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com