• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : पहिल्या वनडेमध्ये टीम इंडिया गारद, इंग्लंडने उडवला धुव्वा

IND vs ENG : पहिल्या वनडेमध्ये टीम इंडिया गारद, इंग्लंडने उडवला धुव्वा

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतीय महिला टीमचा (India vs England) दारूण पराभव झाला आहे. भारताने ठेवलेल्या 202 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 34.5 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पूर्ण केला.

 • Share this:
  ब्रिस्टल, 27 जून : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतीय महिला टीमचा (India vs England) दारूण पराभव झाला आहे. भारताने ठेवलेल्या 202 रनच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 34.5 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पूर्ण केला. इंग्लंडकडून टॅमी ब्यूमॉन्टने सर्वाधिक 87 रनची नाबाद खेळी केली, तर नेताली स्किव्हर 74 रनवर नाबाद राहिली. भारताकडून झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) आणि एकता बिष्ट (Ekta Bisht) यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. इंग्लंडने लॉरेन विनफिल्डला 16 रनवर आणि कर्णधार हिथर नाईटला 18 रनवर गमावलं, पण यानंतर मात्र ब्युमोंट आणि स्किव्हर यांनी इंग्लंडला एकही धक्का लागू दिला नाही. या सामन्यात इंग्लंडची कर्णधार हिथर नाईटने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. हिथरचा हा निर्णय इंग्लंडच्या बॉलरनी योग्य ठरवला आणि भारताला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 201 रन करता आले. भारताकडून मिथाली राजने (Mithali Raj) सर्वाधिक 72 रन केले, तर पूनम राऊतने (Poonam Raut) 32 आणि दीप्ती शर्माने (Deepti Sharma) 30 रनची खेळी केली. इंग्लंडकडून एकेलस्टोनला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर ब्रंट आणि श्रुबसोलला प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. केट क्रॉसनेही एक विकेट मिळवली. भारत आणि इंग्लंड यांच्यातली एकमेव टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर आता 3 वनडे मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. वनडे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय महिला टीमला पुढचा सामना जिंकणं गरजेचं आहे.
  Published by:Shreyas
  First published: