मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs SL : भारत दौऱ्याची 'आठवण', पुढच्याच ओव्हरला बेयरस्टो आऊट

ENG vs SL : भारत दौऱ्याची 'आठवण', पुढच्याच ओव्हरला बेयरस्टो आऊट

इंग्लंडचा आक्रमक खेळाडू जॉनी बेयरस्टो (Johnny Bairstow) याला भारताविरुद्धच्या (India vs England) पहिल्या दोन टेस्टसाठीच्या टीममध्ये निवडण्यात आलेलं नाही. याचा परिणाम त्याचा बॅटिंगवरही झाला आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 24 जानेवारी : इंग्लंडचा आक्रमक खेळाडू जॉनी बेयरस्टो (Johnny Bairstow) याला भारताविरुद्धच्या (India vs England) पहिल्या दोन टेस्टसाठीच्या टीममध्ये निवडण्यात आलेलं नाही. याचा परिणाम त्याचा बॅटिंगवरही झाला आहे. इंग्लंडच्या 16 सदस्यांच्या टीममध्ये बेयरस्टोच्याऐवजी जॉस बटलरला स्थान देण्यात आलं आहे. पण श्रीलंकेविरुद्ध (England vs Sri Lanka) गॉलमध्ये सुरू असणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये या दोघांनाही इंग्लंडच्या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. या टेस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला उतरलेला बेयरस्टो फक्त 27 रन करून आऊट झाला. श्रीलंकेचा विकेटकीपर निरोशन डिकवेला याने बेयरस्टोचं स्लेजिंग करून त्याचं लक्ष भरकटवलं, यात त्याची विकेट गेली. मॅचच्या 35 व्या ओव्हरमध्ये डिकवेलाने बेयरस्टोबाबत टिप्पणी केली. 'तुला भारत दौऱ्यातून का हटवलं? तू कर्णधारानंतरचा सगळ्यात चांगला खेळाडू आहेस आणि आयपीएलमध्येही खेळशील,' असं डिकवेला बेयरस्टोला म्हणाला. यानंतर पुढच्याच ओव्हरला लसिथ एंबुलदेनियाने बेयरस्टोला आऊट केलं. पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेनं केल्या 381 रन या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेने 381 रन केल्या. इंग्लंडकडून जेम्स अंडरसनने सहा विकेट घेतल्या, तर मार्क वूडला तीन आणि कुरनने शेवटची विकेट घेतली. तर श्रीलंकेच्या एंजलो मॅथ्यूजने 110, डिकवेलाने 92, दिलरुवान परेराने 67 आणि कर्णधार दिनेश चंडीमलने 52 रन केले. पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा विजय झाला होता. भारत दौऱ्यासाठी इंग्लंडची टीम जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स अंडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॉस बटलर, जॅक क्राऊली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, क्रीस वोक्स
First published:

पुढील बातम्या