Home /News /sport /

कॉमेंट्री बॉक्समधलं वादग्रस्त वक्तव्य भोवलं, कार्तिकला मागावी लागली माफी

कॉमेंट्री बॉक्समधलं वादग्रस्त वक्तव्य भोवलं, कार्तिकला मागावी लागली माफी

टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला कॉमेंट्री बॉक्समध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागावी लागली आहे. स्काय स्पोर्ट्सवर (Sky Sports) इंग्लंड आणि श्रीलंका (England vs Sri Lanka) यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या वनडेदरम्यान कार्तिकने माफी मागितली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 जुलै : टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला कॉमेंट्री बॉक्समध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागावी लागली आहे. स्काय स्पोर्ट्सवर (Sky Sports) इंग्लंड आणि श्रीलंका (England vs Sri Lanka) यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या वनडेदरम्यान कार्तिकने माफी मागितली. दुसऱ्या सामन्यावेळी कॉमेंट्री करताना कार्तिकने बॅट आणि शेजरच्याची बायको यांची तुलना केली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. 'मागच्या सामन्यात घडलेल्या प्रकारावरुन मला माफी मागायची आहे. मी जाणून बुजून ते वक्तव्य केलं नाही. माझ्याकडून चूक झाली, त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो. असं बोलणं निश्चितच योग्य नाही,' असं कार्तिक तिसऱ्या वनडेवेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये म्हणाला. इंग्लंड-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या वनडेदरम्यान कार्तिकने केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याच्यासोबत असलेले कॉमेंटेटर आनंदी तर झाले, पण त्याच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. मॅच सुरू असताना बॅट्समन परिस्थितीनुसार वेगवेगळ्या बॅटचा वापर करतात, यावर कार्तिकने टोला हाणला. 'बहुतेक बॅट्समनना आपली बॅट आवडत नाही, त्यांना दुसऱ्या बॅट्समनची बॅट आवडते. बॅट शेजाऱ्याच्या पत्नीसारखी असते, जी कायमच तुम्हाला आवडते,' असं कार्तिक कॉमेंट्री करताना म्हणाला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलवेळी दिनेश कार्तिक आणि सुनिल गावसकर हे दोन भारतीय कॉमेंटेटर होते, त्यावेळी कार्तिकच्या कॉमेंट्रीने चाहते चांगलेच खूश झाले. लोकप्रिय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधल्या दिनेश कार्तिकच्या कॉमेंट्रीचं कौतुक केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या