• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • क्रिस वोक्सचा 'पॉवरप्ले', श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केला विक्रम

क्रिस वोक्सचा 'पॉवरप्ले', श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केला विक्रम

इंग्लंडचा फास्ट बॉलर क्रिस वोक्सने (Chris Woakes) श्रीलंकेविरुद्धच्या (England vs Sri Lanka) पहिल्या वनडेमध्ये नवा विक्रम केला आहे. पॉवरप्लेमध्ये क्रिस वोक्सच्या बॉलिंगसमोर श्रीलंकेच्या बॅट्समनना एक-एक रन काढताना अडचणी निर्माण झाल्या.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : इंग्लंडचा फास्ट बॉलर क्रिस वोक्सने (Chris Woakes) श्रीलंकेविरुद्धच्या (England vs Sri Lanka) पहिल्या वनडेमध्ये नवा विक्रम केला आहे. पॉवरप्लेमध्ये क्रिस वोक्सच्या बॉलिंगसमोर श्रीलंकेच्या बॅट्समनना एक-एक रन काढताना अडचणी निर्माण झाल्या. वोक्ससमोर श्रीलंकेच्या बॅट्समनना एवढा संघर्ष केला, की त्यांना पहिल्या 5 ओव्हरमध्ये फक्त 6 रन काढता आल्या. वोक्सने या सामन्यात लागोपाठ 4 मेडन ओव्हर टाकल्या. हा विक्रम करणारा वोक्स दुसरा बॉलर ठरला आहे. त्याच्याआधी स्टुअर्ट ब्रॉडने 13 वर्षांपूर्वी पॉवर प्लेमध्ये 4 मेडन ओव्हर टाकल्या होत्या. वोक्सने आपल्या पहिल्या 5 ओव्हरपैकी 4 ओव्हर मेडन टाकल्या आणि 2 विकेटही घेतल्या, ज्यामुळे श्रीलंकेचा स्कोअर 46/3 असा झाला. श्रीलंकेचा बॅट्समन कुसल परेरा 120 च्या स्ट्राईक रेटने रन काढत होता, पण त्यालाही वोक्सचे बॉल झेपले नाहीत. वनडे सीरिजआधी इंग्लंडने श्रीलंकेचा टी-20 सीरिजमध्येही 3-0 ने दारूण पराभव केला. मागच्या काही वर्षांमध्ये श्रीलंकेची कामगिरी निराशाजनक होत आहे. श्रीलंकेच्या टीमने ऑक्टोबर 2019 पासून आत्तापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, यात त्यांना फक्त एकच मॅच जिंकता आली आहे, तर 12 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. श्रीलंकेने यात ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध सीरिज खेळली. एवढच नाही तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मागच्या 20 पैकी फक्त 3 मॅचमध्येच श्रीलंकेला जिंकता आलं.
  Published by:Shreyas
  First published: