कोलंबो, 15 जानेवारी : श्रीलंका आणि इंग्लंडमध्ये (England vs Sri Lanka) पहिल्या टेस्टला सुरूवात झाली आहे. या टेस्टमध्ये श्रीलंकेच्या इंग्लडच्या मार्क वुडच्या (Mark Wood) घातक बॉलिंगवर श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजच्या (Angelo Mathews) बॅटचे 2 तुकडे झाले. या टेस्ट मॅचमध्ये मार्क वुड आपला घातक मारा करत असताना 10 व्या ओव्हरमध्ये मॅथ्यूजची बॅट तुटली. या मॅचमध्ये वुड 91 मैल प्रतितास इतक्या वेगाने बॉलिंग करत होता. यावेळी मॅथ्यूजने बॉल रोखण्याचा प्रयत्न केला असता बॉलचा वेग जास्तअसल्याने थेट बॅटचे 2 तुकडे झाले.
या मॅचमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या मॅथ्यूजने 27 रन बनवले. त्याने या मॅचमध्ये कॅप्टन दिनेश चंडिमल याच्याबरोबर 56 रनची पार्टनरशिप केली. याच मॅचमध्ये त्याने टेस्ट मॅचमधील आपल्या 6 हजार रन देखील पूर्ण केले. पण पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेला अवघ्या 135 रनमध्ये ऑलआउट करून इंग्लंडने आपली पकड मजबूत केली आहे. स्पिनर डॉम बेस (Domm Bess) आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) घातक बॉलिंगसमोर एकही बॅट्समन तग धरू शकला नाही. श्रीलंकेची संपूर्ण टीम 135 रनमध्ये ऑलआउट झाली. डॉम बेसने 30 रनमध्ये 5 विकेट घेतल्या. याचबरोबर ब्रॉड याने देखील 3 विकेट घेत श्रीलंकेच्या बॅटिंगचे कंबरडे मोडले. श्रीलंकेच्या वतीने कॅप्टन चंडिमल याने सर्वाधिक 28 रन केले.
They really don't make them like they used to!
LIVE #SLvENG COMMS: 👉 https://t.co/wQJvGcMCGs 👈 pic.twitter.com/bQVM7C194R — 🏏FlashScore Cricket Commentators (@FlashCric) January 14, 2021
दरम्यान, इंग्लंडने श्रीलंकेला तगडा प्रतिसाद दिला असून बॅटिंगमध्ये इंग्लडने पहिल्या दिवसअखेर 2 बाद 127 रन बनवले. सुरुवातीला इंग्लंडची अवस्था 2 बाद 17 रन झाली होती. पण त्यानंतर रूट आणि बेअरस्टो यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 110 रनांची पार्टनरशिप केली असून दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याची त्यांच्याकडे संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.