मोठी बातमी! Covid नियमावली मोडल्यामुळे क्रिकेटर पॉझिटिव्ह, ODI मालिका रद्द

मोठी बातमी! Covid नियमावली मोडल्यामुळे क्रिकेटर पॉझिटिव्ह, ODI मालिका रद्द

बायो बबल, सोशल डिस्टन्सिंगचे नियम व्यवस्थित न पाळल्याने काही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (England vs South Africa ODI Series) मालिका संकटात सापडली.

  • Share this:

केप टाऊन, 7 डिसेंबर : Coronavirus च्या सोशल डिस्टन्सिंग आणि बायो बबलचे नियम मोडल्यामुळे इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिका मध्येच रद्द करण्यात आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, काही खेळाडूंना Covid-19 चा संसर्ग झाल्याने मालिका थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूसह ते राहात असलेल्या हॉटेल स्टाफपैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. वास्तविक खेळाडूंचं वास्तव्य असलेलं हे हॉटेल बायो सिक्युअर वातावरणात होतं. पण या बायो बबलचं उल्लंघन करून नियम मोडण्यात आले आणि त्याचा परिणाम थेट सामने रद्द होण्यापर्यंत झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोना संसर्ग झाल्याची बातमी पक्की झाल्यानंतर इंग्लंडनेही रविवारी त्यांच्या टीममध्ये दोन जण पॉझिटिव्ह असल्याचं अनौपचारिकपणे सांगितलं.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या इंग्लंड संघानेसुद्धा पुढचे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. आता इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली आहे.

हा आहे धोनीच्या शेतातला ऑरगॅनिक कोबी, बाजारात तुफान मागणी

टॉसआधीच रद्द झाला होता सामना

यापूर्वी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना रद्द झाला होता. आता संपूर्ण मालिकाच रद्द झाली आहे. टॉसआधीच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वनडे सीरिज रविवार 6 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सहमतीने हा निर्णय झाल्याचंही दक्षिण आफ्रिका बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

IND vs AUS : हार्दिक पांड्या म्हणतो, मी नाही तर हा खेळाडू खरा 'मॅन ऑफ द मॅच'

पाकिस्तानचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

यापूर्वी आतापर्यंत पाकिस्तानचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाकिस्तानी खेळाडू कोरोना पसरवू शकतात, अशी भीती न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाला आहे. पाकिस्तानची टीम मागच्या 10 दिवसांपासून क्वारंटाईन आहे. एकाच वेळी त्यांचे 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर आणखी एका खेळाडूला कोरोना झाल्याचं समजलं.

First published: December 7, 2020, 6:55 PM IST

ताज्या बातम्या