बर्मिंघम, 13 जुलै : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अखेर फॉर्ममध्ये आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये (England vs Pakistan) बाबर आझमने धमाकेदार शतक केलं. पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आणि दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला आणि सीरिजही गमवावी लागली. यानंतर तिसऱ्या वनडेमध्ये बाबरने सगळ्यात जलद 14 शतकं करण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही केला. पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 331/9 एवढा स्कोअर केला.
सीरिज सुरू होण्याआधी इंग्लंड टीममधल्या 7 सदस्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर त्यांना संपूर्ण टीमच बदलावी लागली. नवखी टीम असतानाही इंग्लंडने पाकिस्तानला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाची धूळ चारली. तिसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानची सुरुवात पुन्हा खराब झाली. फखर झमान (Fakhar Zaman) 6 रन करुन आऊट झाला.
21 रनवर पहिली विकेट गेल्यानंतर बाबर आझमने इमाम उल हक (Imam Ul Haq) सोबत 92 रनची आणि मग मोहम्मद रिझवानसोबत (Mohammad Rizwan) 179 रनची मोठी पार्टनरशीप केली. बाबर आझमने 139 बॉलमध्ये 158 रन केले, यामध्ये 14 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. मोहम्मद रिझवान 74 रन आणि इमाम उल हक 56 रन करून आऊट झाला.
Pakistan set England a target of 332 after an incredible knock from Babar Azam! Who are you backing to win this contest?#ENGvPAK | https://t.co/wt6TEMLTGd pic.twitter.com/x4JHNNalpg
— ICC (@ICC) July 13, 2021
कोणत्याही पाकिस्तानी कर्णधाराचा वनडे क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी शोएब मलिकच्या (Shoaib Malik) नावावर हा विक्रम होता. 2008 साली मलिकने भारताविरुद्ध नाबाद 125 रन केले होते.
बाबर आझमने 81 इनिंगमध्येच 14 शतकं करण्याचा विक्रम केला आहे. महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये हा सगळ्यात जलद 14 शतकं करण्याचा विक्रम आहे. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू मेग लेनिंगने (Meg Lening) 82 इनिंगमध्ये 14 शतकं केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाला (Hashim Amla) 84, ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) 98 आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 103 इनिंगमध्ये 14 शतकं करण्यात आली होती.
बाबर आझम इंग्लंडमध्य तीन शतकं करणारा पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू बनला आहे. कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये शतक करणारा बाबर दुसरा पाकिस्तानी खेळाडू आहे. याआधी 1983 साली इम्रान खाननी (Imran Khan) वनडेमध्ये नाबाद 102 रनची खेळी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Babar azam, Cricket, England, Pakistan