मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टी-20 मध्ये 5 शतकं करणाऱ्या बॅट्समनचं करियर संपलं! निवृत्त व्हायचा सल्ला

टी-20 मध्ये 5 शतकं करणाऱ्या बॅट्समनचं करियर संपलं! निवृत्त व्हायचा सल्ला

पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजआधी इंग्लंडच्या (England vs Pakistan) 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाली. यामुळे इंग्लंडने तडकाफडकी संपूर्ण टीमच बदलून टाकली. आता वनडे सीरिजसाठ बेन स्टोक्सला (Ben Stokes) कर्णधार करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 6 जुलै : पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजआधी इंग्लंडच्या (England vs Pakistan) 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाली. यामुळे इंग्लंडने तडकाफडकी संपूर्ण टीमच बदलून टाकली. आता वनडे सीरिजसाठ बेन स्टोक्सला (Ben Stokes) कर्णधार करण्यात आलं आहे. तसंच टीममध्ये जेम्स विन्स, डेविड मलान आणि बेन डकेट या खेळाडूंना संधी मिळाली आहे, पण फॉर्ममध्ये असलेला आक्रमक ओपनिंग बॅट्समन एलेक्स हेल्सला (Alex Hales) टीममध्ये जागा मिळाली नाही. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने (Michael Vaughan) हेल्सला क्रिकेटमधून निवृत्त व्हावं, असा सल्ला दिला आहे. तसंच हेल्सचं करियर आता संपलं असल्याचंही वॉन म्हणाला.

'एलेक्स हेल्स टीममध्ये नाही. हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अंत आहे. मी त्याच्यासाठी खूप दु:खी आहे, कारण त्याच्या चुकीची शिक्षा त्याने भोगली, पण त्याला नंतर एकही संधी मिळाली नाही. आपण प्रत्येक आठवड्याला चूक करतो. जो कोणी आपण चूक करत नाही, असं म्हणतो तो खोटं बोलतो,' असं ट्वीट मायकल वॉनने केलं.

खेळाडूच्या फॉर्मवर त्याची टीममध्ये निवड होते, पण हेल्सच्या बाबतीत मात्र तसं होताना दिसत नाही. मागच्या दोन वर्षांपासून तो इंग्लंडच्या टीममधून बाहेर आहे. जगातल्या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये तो बऱ्याच रन करत आहे, तरीही त्याच्याकडे दुलर्क्ष केलं जात आहे.

हेल्स सध्या इंग्लंडमध्ये टी-20 स्पर्धा खेळत आहे, यात तो सर्वाधिक रन करणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. 11 इनिंगमध्ये त्याने 47 पेक्षा जास्तच्या सरासरीने 385 रन केले आहेत, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 172 पेक्षा जास्त आहे. हेल्सने आतापर्यंत एकूण 17 सिक्स मारल्या. बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरकडून खेळताना हेल्सने सर्वाधिक 543 रन केले होते, ज्यात तब्बल 30 सिक्सचा समावेश होता. तरीही इंग्लंडच्या निवड समितीने हेल्सची निवड केली नाही.

वनडे सीरिजसाठी इंग्लंडची टीम

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बेल, डेनी ब्रिग्स, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉले, बेन डकेट, लुईस जॉर्ज, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, डेविड मलान, साकिब महमूद, क्रेग ओवर्टन, मॅट पार्किनसन, डेविड पेन, फिल सॉल्ट, जॉन सिम्पसन, जेम्स विन्सी

First published:
top videos

    Tags: Cricket, England