• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'तू तर डबल ढोलकी', सोशल मीडियावर शोएब अख्तर ट्रोल, हे आहे कारण

'तू तर डबल ढोलकी', सोशल मीडियावर शोएब अख्तर ट्रोल, हे आहे कारण

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आपल्या युट्यूब चॅनलवर नेहमीच आपल्या टीमवर टीका करताना दिसतो. जेव्हा पाकिस्तानचा पराभव होतो तेव्हा शोएब टीमच्या कमजोरी मांडण्यात अजिबात कसर ठेवत नाही.

 • Share this:
  मुंबई, 17 जुलै : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आपल्या युट्यूब चॅनलवर नेहमीच आपल्या टीमवर टीका करताना दिसतो. जेव्हा पाकिस्तानचा पराभव होतो तेव्हा शोएब टीमच्या कमजोरी मांडण्यात अजिबात कसर ठेवत नाही, पण शनिवारी मात्र शोएबने पाकिस्तान टीमचं कौतुक केलं. पाकिस्तान बेस्ट टी-20 टीम असल्याचं शोएब म्हणाला, यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर दुतोंडी माणूस असल्याची टीका केली. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानचा (England vs Pakistan) 3-0 ने पराभव झाला. या पराभवानंतर शोएबने पाकिस्तानच्या टीमवर सडकून टीका केली होती. पाकिस्तानच्या टीममध्ये कोणीही स्टार खेळाडू नाही. अशाच प्रकारे टीम खेळत राहिली, तर एक दिवस असा येईल जेव्हा देशात कोणीच क्रिकेट बघणार नाही, असं शोएब अख्तर म्हणाला होता.
  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर लगेच शोएबने टीमचं कौतुक करायला सुरुवात केली. आपल्या युट्युब चॅनलवर शोएबने एक व्हिडिओ पोस्ट केला. यात त्याने पाकिस्तानला जगातली सर्वोत्तम टी-20 टीम असल्याचं सांगितलं. यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं. शुक्रवारी नॉटिंगहममध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये पाकिस्तानचा 31 रनने विजय झाला. टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानने सर्वाधिक स्कोअरची नोंद केली. 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून त्यांनी 232 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड 201 रनवर ऑल आऊट झाली. 'इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन आहे, पण पाकिस्तानच्या टीमने त्याला मॉर्गाला पाठवलं. रावळपिंडीमध्ये मॉर्गा ही जागा आहे. इंग्लंडची टीम पाकिस्तानला हलक्यात घेत होती, पण पाकिस्तानची टीम टी-20 मध्ये बेस्ट आहे, हे त्यांना माहिती नाही. यावर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कपही पाकिस्तानची टीम जिंकू शकते,' असं शोएब म्हणाला. पाकिस्तानची टीम टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकली तरी ते योग्य दिशेने जात नसल्याचं मत शोएब अख्तरने मांडलं.
  Published by:Shreyas
  First published: