मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs PAK : कार्तिकने कॉमेंट्रीमध्ये केलं असं वक्तव्य, पाकिस्तानी चाहत्यांनी केला सलाम

ENG vs PAK : कार्तिकने कॉमेंट्रीमध्ये केलं असं वक्तव्य, पाकिस्तानी चाहत्यांनी केला सलाम

टीम इंडियातून बाहेर असलेला विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या इंग्लंडमध्ये कॉमेंट्री करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या कॉमेंट्रीसाठी कार्तिक इंग्लंडला गेला होता, यानंतर त्याने इंग्लंड-श्रीलंका (England vs Sri Lanka) आणि आता इंग्लंड-पाकिस्तान (England vs Pakistan) सीरिजची कॉमेंट्रीही केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

लंडन, 14 जुलै : टीम इंडियातून बाहेर असलेला विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या इंग्लंडमध्ये कॉमेंट्री करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या कॉमेंट्रीसाठी कार्तिक इंग्लंडला गेला होता, यानंतर त्याने इंग्लंड-श्रीलंका (England vs Sri Lanka) आणि आता इंग्लंड-पाकिस्तान (England vs Pakistan) सीरिजची कॉमेंट्रीही केली. इंग्लंड-पाकिस्तानमधल्या तिसऱ्या वनडेदरम्यान कार्तिकने केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानी चाहते त्याच्यावर खूश झाले आहेत. कार्तिकने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचं कौतुक केलं आणि तो क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर का आहे, ते सांगितलं. या सामन्यात बाबरने 158 रनची खेळी केली.

'वर्ल्ड क्लास बॅट्समन जास्त मॅच संघर्ष करत नाही, त्यामुळे बाबर क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे,' असं कार्तिक म्हणाला. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी कार्तिकच्या कॉमेंट्रीचं कौतुक केलं. बाबर आझमने या सामन्यात धडाकेबाज शतक केलं तरी पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. या वनडे सीरिजमध्ये इंग्लंडचा 3-0 ने विजय झाला.

तिसऱ्या वनडेमध्ये बाबरने सगळ्यात जलद 14 शतकं करण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही केला. बाबर आझमने 81 इनिंगमध्येच 14 शतकं करण्याचा विक्रम केला आहे. महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये हा सगळ्यात जलद 14 शतकं करण्याचा विक्रम आहे. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू मेग लेनिंगने (Meg Lening) 82 इनिंगमध्ये 14 शतकं केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाला (Hashim Amla) 84, ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) 98 आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) 103 इनिंगमध्ये 14 शतकं करण्यात आली होती.

कोणत्याही पाकिस्तानी कर्णधाराचा वनडे क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी शोएब मलिकच्या (Shoaib Malik) नावावर हा विक्रम होता. 2008 साली मलिकने भारताविरुद्ध नाबाद 125 रन केले होते.

बाबर आझम इंग्लंडमध्य तीन शतकं करणारा पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू बनला आहे. कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये शतक करणारा बाबर दुसरा पाकिस्तानी खेळाडू आहे. याआधी 1983 साली इम्रान खाननी (Imran Khan) वनडेमध्ये नाबाद 102 रनची खेळी केली होती.

First published:

Tags: Babar azam, Cricket, Pakistan