• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • England Vs Pakistan: कसं शक्य आहे? फिल्डरनं कॅच सोडला तरी फलंदाज झाला बाद, पाहा अजब विकेटचा VIDEO

England Vs Pakistan: कसं शक्य आहे? फिल्डरनं कॅच सोडला तरी फलंदाज झाला बाद, पाहा अजब विकेटचा VIDEO

इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 583 धावा केल्या. तर पाकिस्तानं पहिल्या डावात 273 धावा केल्या. पहिल्या डावात जेम्स अँडरसननं (James Anderson) 5 विकेट घेतल्या.

 • Share this:
  साउथहॅम्पटन, 24 ऑगस्ट : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना (Eng Vs Pak 3rd Test) होत आहे. अखेरच्या कसोटी सामन्यातही इंग्लंडनं मजबूस स्थितीत आहे. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 583 धावा केल्या. तर पाकिस्तानं पहिल्या डावात 273 धावा केल्या. पहिल्या डावात जेम्स अँडरसननं (James Anderson) 5 विकेट घेतल्या. मात्र या सामन्यात एक अजब विकेट पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी मोहम्मद अब्बासला (Mohammad Abbas) स्टुअर्ट ब्रॉडनं रनआउट केले. सुरुवातीला ब्रॉडनं कॅच सोडला, तरी अब्बास बाद झाला. या अजब विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा-खरं की खोटं? धोनी आणि रोहितवरून महाराष्ट्रात राडा, एकाला उसात नेवून चोपलं हा प्रकार घडला तेव्हा पाकिस्ताननं 231 धावांवर 8 गडी गमावले होते. पाकिस्तानचा कर्णधार अजहर अली (Azhar Ali) 129 धावांवर फलंदाजी करत होता, तर अब्बास त्याला साथ देता. अजहरवं अँडरसनच्या चेंडूवर हवेत शॉट मारला, ब्रॉडला कॅच घेण्याची संधी होती, मात्र त्यानं ती गमावली. ब्रॉडच्या हातातून कॅच सुटला यावेळी अब्बास चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना ब्रॉडनं त्याना धावबाद केले. ही अजब विकेट पाहून मैदानावरील सर्वच खेळाडू आश्चर्यचकित झाले. तर बाद झाल्यानंतर अब्बासला दोन मिनिटे काय झाले हे कळलेच नाही. वाचा-VIDEO: मैं तो सुपरमैन! हवेत उडी मारून फिल्डरनं घेतला कॅच, खेळाडूही झाले हैराण वाचा-मुंबई इंडियन्सला मोठा झटका! ‘हा’ स्टार गोलंदाज खेळणार नाही सुरूवातीचे सामने या सामन्यात, इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 583 धावा केल्या. इंग्लंडकून जॅक क्रॉलीनं 267 धावांची तुफानी केली तर त्याला बटलरनं 152 धावा करत चांगली साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार अजहर अली वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. अजहर अली सध्या 141 धावांवर खेळत आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: