मॅंचेस्चर, 03 सप्टेंबर : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा टी-20 (Eng Vs Pak 3rd T20) सामना मॅचेंस्टरमध्ये झाला. हा सामना पाकिस्ताननं 5 विकेटनं जिंकला. मोहम्मद हफीजच्या (Mohammad Hafeez) 86 धावांच्या खेळीच्या जोरावर पाकनं हा सामना जिंकला. मात्र या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. या सामन्यात माजी कर्णधार सरफराज अहमदला (Sarfaraz Ahmed) खेळवण्यात आले. मात्र या सामन्यात ना सरफराजची फलंदाजी चालली ना त्यानं स्टम्पमागे चांगली कामगिरी केली. एवढेच नाही तर सरफराजनं एक सोपे स्टम्पिंगही मिस केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात इंग्लंडकडून मोइन अलीनं 61 धावा केल्या. मात्र जेव्हा मोइन अली 7 धावांवर खेळत होता, तेव्हा त्याला आउट करण्याची चांगली संधी पाकिस्तानकडे होती. इमाद वसीमच्या चेंडूवर मोइन अली पुढे येउन मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्नात होता. मात्र चेंडू मिस झाला आणि थेट सरफराज अहमदच्या हातात गेला. मात्र हातात चेंडू असूनही अहमदला मोइन अलीला बाद करता आले नाही. त्याच्या हातातून चेंडू स्लिप झाला. तोपर्यंत मोइन अली क्रिझच्या आत आला.
वाचा-मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू पडला चिअरलीडरच्या प्रेमात, मॅच दरम्यानच जडला जीव
वाचा-धोनीसोबत खरच वाद झाला होता? 'त्या' प्रकरणाबाबत सुरेश रैनानं केला खुलासा
या सामन्यात पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करत 190 धावा केल्या. यात मोहम्मद हफीजनं सर्वात जास्त 86 धावा केल्या. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या हैदर अलीनं 54 धावांची खेळी केली. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी हा सामना पाकिस्ताननं 5 विकेटनं जिंकला.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.