टेस्ट क्रिकेटमधला नकोसा विक्रम, 37 व्यांदा शून्यवर आऊट झाला बॅट्समन

टेस्ट क्रिकेटमधला नकोसा विक्रम, 37 व्यांदा शून्यवर आऊट झाला बॅट्समन

क्रिकेटमध्ये रोज नवनवे विक्रम होताना आपण पाहत असतो, यातले काही विक्रम करण्याचं स्वप्न खेळाडू बाळगून असतात, तर काही विक्रम करण्याची त्यांची इच्छा अजिबात नसते. इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या नावावरही असाच नकोसा विक्रम झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून : क्रिकेटमध्ये रोज नवनवे विक्रम होताना आपण पाहत असतो, यातले काही विक्रम करण्याचं स्वप्न खेळाडू बाळगून असतात, तर काही विक्रम करण्याची त्यांची इच्छा अजिबात नसते. इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या नावावरही असाच नकोसा विक्रम झाला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉड 37व्यांदा शून्यवर आऊट झाला. टेस्टमध्ये एवढेवेळा शून्यवर आऊट होणारा ब्रॉड दुसरा खेळाडू बनला आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शून्य रनवर आऊट होण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्श (Courtney Walsh) यांच्या नावावर आहे. वॉल्श तब्बल 43 वेळा एकही रन न करता माघारी परतले. या यादीमध्ये ब्रॉड दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, त्याने न्यूझीलंडच्या क्रिस मार्टीन (Chris Martin) याचा 36 वेळा शून्य रन करण्याचा विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाचा महान बॉलर ग्लेन मॅकग्रा (Glenn Mcgrath)  35 डक सह चौथ्या क्रमांकावर आहे. तर भारताकडून सर्वाधिकवेळा शून्य रनवर आऊट होण्याचा रेकॉर्ड इशांत शर्माच्या (Ishant Sharma) नावावर आहे. इशांत टेस्ट क्रिकेटमध्ये 33 वेळा शून्यवर माघारी परतला. जागतिक यादीमध्ये इशांत सहाव्या क्रमांकावर आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंडचा (England vs New Zealand) कर्णधार जो रूट (Joe Root) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा 303 रनवर ऑल आऊट झाला. ब्रॉडला ट्रेन्ट बोल्टने शून्य रनवर आऊट केलं. न्यूझीलंडकडून बोल्टने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मॅट हेन्रीला 3 विकेट मिळाल्या. एझाज पटेलला 2 आणि नील वॅगनरला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून रॉरी बर्न्सने 81 रन आणि लॉरेन्सने नाबाद 81 रनची खेळी केली.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातली पहिली टेस्ट ड्रॉ झाली आहे. तर दुसरा सामना सुरू आहे. या मॅचनंतर न्यूझीलंड भारताविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळणार आहे. 18-22 जूनमध्ये ही फायनल होईल.

Published by: Shreyas
First published: June 11, 2021, 8:46 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या