मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ENG vs NZ : रॉस टेलरने मन जिंकलं, रूटचा कॅच पकडल्यानंतर...

ENG vs NZ : रॉस टेलरने मन जिंकलं, रूटचा कॅच पकडल्यानंतर...

इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी अशी घटना घडली, ज्याने क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलं.

  • Published by:  Shreyas
लंडन, 6 जून : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी अशी घटना घडली, ज्याने क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलं. या टेस्टचा तिसरा दिवस पावसामुळे होऊ शकला नाही, यानंतर चौथ्या दिवसाची पहिलीच ओव्हर काईल जेमिसनने (Kyle Jamieson) टाकली. दिवसाच्या पहिल्याच बॉलला इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याचा कॅच स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरने (Ross Taylor) पडकला, यानंतर जेमिसनसह न्यूझीलंडची टीम जल्लोष करायला लागली, पण रॉस टेलर या कॅचबाबत साशंक होता. अखेर त्याने मैदानातल्या अंपायरना याबाबत सांगितलं. रॉस टेलरने शंका उपस्थित केल्यानंतर मैदानतले अंपायर थर्ड अंपायरकडे गेले. थर्ड अंपायरने अनेकवेळा रिप्ले बघितल्यानंतर टेलरने कॅच योग्य पद्धतीने पकडल्याचं थर्ड अंपायरने सांगितलं, त्यामुळे जो रूटला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. रूट 42 रन करून आऊट झाला. टेलरच्या या कृतीमुळे त्याच्या इमानदारीचं आणि खेळ भावना जोपासल्याचं कौतुक होतं आहे. टेलरच्या मैदानातल्या या वर्तनामुळे किवी टीमला जगातली सगळ्यात इमानदार टीम का म्हणातात, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. जो रूट आऊट झाला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 111 रन होता. रूट पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर इंग्लंडला आणखी 166 रन करता आले आणि त्यांनी 7 विकेट गमावल्या. इंग्लंडकडून रोरी बर्न्सने सर्वाधिक 132 रन केले. याशिवाय ओली रॉबिन्सननेही 42 रनची खेळी केली. त्याआधी डेवॉन कॉनवेच्या द्विशतकामुळे न्यूझीलंडने 378 रन केले होते. चौथ्या दिवसाअखेरीस न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये 2 विकेट गमावून 62 रन केले. पहिल्या इनिंगमधल्या मोठ्या धावसंख्येमुळे न्यूझीलंडला 165 रनची आघाडी मिळाली आहे. या सामन्याचा एकच दिवस शिल्लक असल्यामुळे आता मॅचचा निकाल लागणं मुश्किल आहे.
First published:

Tags: Cricket news, England, Joe root, New zealand

पुढील बातम्या