Home /News /sport /

ENG vs NED : वनडेमध्ये गल्ली क्रिकेटचा माहोल, खेळाडू-कॅमेरामन बॉल शोधण्यासाठी झाडात! VIDEO

ENG vs NED : वनडेमध्ये गल्ली क्रिकेटचा माहोल, खेळाडू-कॅमेरामन बॉल शोधण्यासाठी झाडात! VIDEO

गल्ली क्रिकेटमध्ये (Gully Cricket) खेळत असताना बॉल हरवल्यानंतर आपल्यातले बरेच जण शोधायला जातात, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही असंच झालं तर तुम्हीही हैराण व्हालं. इंग्लंड आणि नेदरलँड्स (England vs Netherlands) यांच्यात एम्स्टेल्विनमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यातही अशीच घटना घडली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 जून : गल्ली क्रिकेटमध्ये (Gully Cricket) खेळत असताना बॉल हरवल्यानंतर आपल्यातले बरेच जण शोधायला जातात, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही असंच झालं तर तुम्हीही हैराण व्हालं. इंग्लंड आणि नेदरलँड्स (England vs Netherlands) यांच्यात एम्स्टेल्विनमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यातही अशीच घटना घडली. खेळाडूच नाही तर ग्राऊंड स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीमही बॉल शोधण्यासाठी झाडामध्ये गेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये पहिले बॅटिंग करत असलेल्या इंग्लंडचा ओपनर डेव्हिड मलानने 9व्या ओव्हरमध्ये पीटर सिलारच्या बॉलिंगवर मारलेला सिक्स मैदानाबाहेर झाडांमध्ये गेला. यानंतर लगेचच नेदरलँड्सचे काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ बॉल शोधण्यासाठी झाडांमध्ये गेले. बरेच प्रयत्न केल्यानंतरही त्यांना बॉल सापडला नाही, त्यामुळे ब्रॉडकास्टिंग टीममधला कॅमेरामनही त्यांच्या मदतीला गेला. यानंतर त्यांना बॉल मिळाला. बॉल मिळाल्यानंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष करण्यात आला. इंग्लंडने इतिहास घडवला इंग्लंडने या सामन्यात इतिहास घडवत वनडे क्रिकेटमधल्या सर्वाधिक स्कोअरची नोंद केली. इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 498 रन केले, यात त्यांनी 26 सिक्स आणि 36 फोर मारल्या. आयपीएल 2022 मध्ये धमाका करणाऱ्या जॉस बटलरने (Jos Buttler) 70 बॉलमध्ये नाबाद 162 रनची खेळी केली, यामध्ये 7 फोर आणि 14 सिक्सचा समावेश होता. याशिवाय फिलिप सॉल्टने (Philip Salt) 93 बॉलमध्ये 122 आणि डेव्हिड मलानने 109 बॉलमध्ये 125 रनची खेळी केली. सॉल्टने 14 फोर आणि 3 सिक्स तर मलानने (David Malan) 9 फोर आणि 3 सिक्स मारल्या. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) 300 च्या स्ट्राईक रेटने 22 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले, यात त्याने 6 फोर आणि 6 सिक्स ठोकले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: England

    पुढील बातम्या