ENG Vs IRA: तब्बल 129 दिवसांनंतर आजपासून वन-डे क्रिकेटला होणार सुरुवात, खेळाडूंसाठी नियम कडक

ENG Vs IRA: तब्बल 129 दिवसांनंतर आजपासून वन-डे क्रिकेटला होणार सुरुवात, खेळाडूंसाठी नियम कडक

कोरोनाच्या संकटात 13 मार्चपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला नव्हता. आता तब्बल 100 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आहे.

  • Share this:

साउथहँप्टन, 30 जुलै: कोरोनाच्या संकटात जगभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. परिणामी रद्द झालेले क्रिकेट सामनेही सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. तर, आजपासून इंग्लंड-आयर्लंड (England vs Ireland) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. इंग्लंड-आयर्लंड यांच्यात तब्बल 129 दिवसांनी एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.

या मालिकेत इंग्लंडने आपल्या दिग्गज खेळाडूंना म्हणजेच बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जो रूट यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. 2019ला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इयॉन मार्गनच्या नेतृत्वाखाली आजपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे.

वाचा-इंग्लंडनं विडिंजला हरवत जिंकली मालिका! टेस्ट वर्ल्ड कपच्या गुणतालिकेत झाला बदल

कोरोनाच्या संकटात 13 मार्चपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला नव्हता. आता तब्बल 100 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आहे. दरम्यान, हा सामनाही दर्शकांशिवाय खेळला जाणार आहे.

वाचा-युएईमध्ये बदलणार विराटचं नशीब? ‘हे’ 3 खेळाडू पहिल्यांदाच संघाला करणार चॅम्पियन

असे असणार नियम

1. रिकामे स्टेडियम

कोरोनाव्हायरस हा एका माणसकडून दुसऱ्याकडे लगेच पसरला जातो. त्यामुळेच हा आतंरराष्ट्रीय सामना प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजेच स्टेडियमवर प्रेक्षक नसतील. हा निर्णय कोरोनाचे संक्रमण होऊ नये या दृष्टीने घेण्यात आला आहे.

2. ठिकठिकाणी सॅनिटायझर

दुसरा मोठा बदल म्हणजे स्टेडियमवर ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. जेथे वेळोवेळी खेळाडू आपल्या हात सॅनिटाइज करतील. खेळाडूंना सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे.

3. खेळाडू एकत्र येऊन आनंद साजरा करणार नाहीत

क्रिकेटच्या सामन्यात कायम पाहिले जाते की, गोलंदाजनं विकेट घेतल्यानंतर खेळाडू मैदानावर एकत्र जमतात. एकमेकांना टाळ्या देतात, मिठ्या मारतात. मात्र आता असे करता येणार नाही. खेळाडूंना मिठी किंवा एकत्र येण्यास सक्त मनाई आहे. खेळाडू एकमेकांना एल्बो टच करू शकतात.

4. दर्शकांचा आवाज आणि टीव्ही स्क्रीन

हा सामना दर्शकांशिवाय असला तरी, खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानात फेक क्राउज नॉइद असेल. याशिवाय मैदानात मोठ मोठ्य स्क्रीन लावण्यात येणार आहे. याच्या मदतीनं लाईव्ह व्हूचा आनंद घेता येईल.

5. चेंडूवर नाही लावता येणार थूक

क्रिकेटमधला सगळ्यात मोठा बदल म्हणजे गोलंदाजानं चेंडू चमकवण्यासाठी आता थूक लावता येणार नाही. जर खेळाडू असे करतील तर त्यांना ताकीद देण्यात येईल. सतत असे झाल्यास खेळाडूंना दंडही भरावा लागेल. खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी आपल्या घामाचा वापर करू शकतात.

Published by: Priyanka Gawde
First published: July 30, 2020, 9:11 AM IST

ताज्या बातम्या