भारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम

भारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम

पहिल्याच टी- 20 सामन्यात भारताने इंग्लंडवर 8 गडी राखून मात केली. 3 सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत 1-0 ने आघाडीवर आहे

  • Share this:

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी- 20 सामन्यात विजय मिळवल्यावर इंग्लंड दौऱ्यात भारताचा संघ कशी कामगिरी करणार याचीच उत्सुकता साऱ्यांना होती. पहिल्याच टी- 20 सामन्यात भारताने इंग्लंडवर 8 गडी राखून मात केली. 3 सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत 1-0 ने आघाडीवर आहे. या विजयी सामन्यात भारतीय खेळाडूंनी 7 विक्रमांची नोंद केली. हे विक्रम कोणते याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

हेही वाचा:

भारताच्या विजयात केएल राहुल, कुलदीप यादवचा सिंहाचा वाटा, मालिकेत १-० ने आघाडी

टी- 20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावा करणारा विराट कोहली हा चौथा फलंदाज ठरला.

या सामन्यात कोहलीच्या नावावर अजून एका विक्रमाची नोंद झाली. टी-20 मध्ये सर्वात जलद 2 हजार धावा करण्याचा विक्रम कोहलीने या सामन्यात केला. कोहलीने 56 डावांमध्ये ही किमया साधली.

लोकेश राहुलचं टी-20 क्रिकेटमधलं हे दुसरं शतक ठरलं. राहुलने पहिलं शतक झिम्बाब्वेविरुद्ध झळकावलं होतं.

टी-20 क्रिकेटमध्ये 5 बळी घेणारा कुलदीप यादव हा पहिला डावखुरा मनगटी फिरकीपटू ठरला आहे.

हेही वाचा:

47 वर्षांनंतर नागपुरात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन!

टी-20 क्रिकेटमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त बळी घेणारा कुलदीप यादव तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी युझवेंद्र चहलने 2017 मध्ये झालेल्या

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 25 धावांमध्ये 6 गडी बाद केले होते. तर 2018 मध्ये भुवनेश्वर कुमारने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धात 24 धावांमध्ये 5 गडी बाद केले होते.

टी-20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात लागोपाठ दोन चेंडूवर यष्टीचीत करणारा कुलदीप यादव पहिला गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा:

पुण्यात हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन जवानासह चार जण जखमी

सर्वांचा लाडका महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 33 व्या यष्टीचीत फलंदाजाची नोंद केली. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त यष्टीचीत बळी घेण्याचा मान आता धोनीच्या नावावर आहे. धोनीने पाकिस्तानच्या कामरान अकमलचा विक्रम मोडला. अकमलने यापूर्वी 32 यष्टीचीत बळी घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 08:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading