वाचा-विराटच्या संघाचे खेळाडू आता RCB सोडून मेस्सीसोबत खेळणार? आली ऑफर इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं 87 धावांवर 3 विकेट गमावले होते. 57 चेंडूवर त्यांना 59 धावा करायच्या होत्या. त्यावेळी आदिल रशीद गोलंदाजीसाठी आला. रशीदच्या रहस्यमय गुगलीनं मात्र फिंचची झोप उडली. चेंडू ग्राउंडवर टप्पा पडून स्टम्पच्या आत घुसला. फिच त्यावेळी 39 धावांवर खेळत होता. वाचा-कोरोनाला घाबरले दिग्गज खेळाडू? आतापर्यंत 'या' 5 खेळाडूंनी घेतली IPLमधून माघार इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोनं सर्वात जास्त 55 धावा केल्या. याशिवाय एकही फलंदाज मैदानावर जास्ता काळ टीकू शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर केवळ 146 धावांचे आव्हान होते. मात्र रशीदच्या गोलंदाजीमुळे या आव्हानाचा पाठलाग करणेही ऑस्ट्रेलियाला कठिण गेले. अखेर ऑस्ट्रेलियांनं हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये 5 विकेटनं जिंकला.Siri, show me the perfect googly... Look no further 👀 Live clips: https://t.co/I4P2yq86cT#ENGvAUS pic.twitter.com/K3h6T7Hxuc
— England Cricket (@englandcricket) September 8, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket