साऊथॅम्प्टन, 08 सप्टेंबर : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Eng Vs Aus) यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना साउथहॅम्पटन येथे रविवारी खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 6 विकेटनं हरवले. या सामन्याचा हिरो ठरला जॉस बटलर (Jos Buttler). बटलरनं या सामन्यात 77 धावांची खेळी केली. मात्र या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. एक फलंदाज चक्क हिट विकेट आऊट झाला.
या सामन्यात जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) अशा प्रकारे आऊट झाले की त्यानंतर त्याच्यावर टीका करण्यात आली. मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीचा सामना करत असताना बेअरस्टो हिट विकेट आऊट झाला.
वाचा-एका महिलेमुळे जोकोविच अमेरिकन ओपनमधून बाहेर, VIDEO पाहूनच कळेल नेमकं काय घडलं
या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंग्लंडपुढे 158 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांनी ओपनिंग केली. त्यांनी इंग्ंलंडचा चांगली सुरुवात करून दिली. मात्र मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बेअरस्टो हिटविकेट आऊट झाला. स्टार्कच्या बाउन्सरचा सामना करत असताना त्याची बॅट स्टम्पला लागली.
वाचा-रोहित शर्मा नाही तर 'हा' खेळाडू IPL मध्ये मारू शकतो डबल सेंच्यूरी
He hits two consecutive boundaries and then this happens!!!! What a mistake Johnny Bairstow. #ENGvAUS #AUSvENG #Australia #England #CricketPlayedLouder #Cricket pic.twitter.com/yk9EydJEM4
— Uzairgokak (@uzairgokak) September 6, 2020
वाचा-IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडू वापरणार एक विशेष डिव्हाइस, असं करेल काम!
बेअरस्टो बाद झाल्यानंतर बटलर आणि डेव्हिड मिलान यांनी फलंदाजी करण्यास सुरुवात केली.या दोघांनी संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात बटलरनं 77 तर मलाननं 42 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना अॅस्टन आगरनं 2 विकेट घेतल्या तर मिशेल स्टार्क आणि अॅडम जम्पाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाल्या. तीन सामन्यांच्या या मालिकेत, इंग्लंड 2-0ने आघाडीवर आहे. तर, तिसरा सामना 8 सप्टेंबरला होणार आहे.