Home /News /sport /

जंटलमन गेमला डाग! बाद होईना म्हणून यष्टीरक्षकाने फलंदाजालाच दिल्या शिव्या, VIDEO VIRAL

जंटलमन गेमला डाग! बाद होईना म्हणून यष्टीरक्षकाने फलंदाजालाच दिल्या शिव्या, VIDEO VIRAL

इंग्लंडचा यष्टीरक्षक बटलरने फिलेंडरला शिव्या दिल्या. फलंदाजचे लक्ष विचलित करण्यासाठी असा प्रयत्न बटलरने दिला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    केपटाऊन, 08 जानेवारी : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर आणि आफ्रिकेचा फलंदाज वर्नोन फिलेंडर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विकेट घेण्यात यश मिळत नव्हतं. तेव्हा इंग्लंडचा यष्टीरक्षक बटलरने फिलेंडरला शिव्या दिल्या. फलंदाजचे लक्ष विचलित करण्यासाठी असा प्रयत्न बटलरने दिला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंग्लंडने हा सामना 189 धावांनी जिंकला. जोस बटलरने वर्नोन फिलेंडरला यष्ट्यांमागून डिवचलं. बटलरकडून सातत्याने अपशब्द वापरले जात असतानाही फिलेंडरनं मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. सुरुवातीला स्लेजिंग करूनही फिलेंडर विचलित होत नाही, बाद होत नाही हे लक्षात आल्यानंतर बटलरने थेट शिव्याच देण्यास सुरुवात केली. फिलेंडरला मुर्ख म्हणत त्याला बाद करण्याचं आव्हान दिलं. यावेळी स्लिपमध्ये असलेल्या बेन स्टोक्सनेसुद्धा फिलेंडरला डिवचलं. मात्र याकडे लक्ष न देता फिलेंडर मैदानावर टिकून होता. फिलेंडरने 51 चेंडू खेळत 8 धावा केल्या. 10 व्या विकेटच्या रुपात फिलेंडरला बेन स्टोक्सने त्याला बाद केलं. फिलेंडरला बाद करून इंग्लंडने ही कसोटी जिंकली. या मैदानावर इंग्लंडने 62 वर्षांनी विजय मिळवला. इंग्लंडने केपटाउनमध्ये दक्षिण आफ्रिकेला 1957 मध्ये पराभूत केलं होतं. दक्षिण आफ्रिकेसमोर या कसोटीत 438 धावांचे आव्हान होते. त्यानंतर संघ 248 धावांवर बाद झाला. शेवटचा गडी बाद झाला तेव्हा फक्त 8.2 षटके बाकी राहिली होती. स्टोक्सने अखेरच्या 14 चेंडूत 3 गडी बाद करून विजयाचा मार्ग मोकळा केला. वाचा : भारतीय संघाला धक्का, दुखापतीमुळे मुंबईकर खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सर्वाधिक वेळ इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना केला. सलामीवीर पीटर मलानने 369 मिनिटे खेळपट्टीवर मुक्काम ठोकला होता. त्याने 288 चेंडूंचा सामना करत 84 धावा केल्या. सॅम कर्रनने त्याला बाद केलं. इंग्लंडला शेवटच्या सत्रात विजयासाठी 31 षटकात 5 विकेट हव्या होत्या. वाचा : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 'सरप्राइज पॅकेज' खेळाडू, विराटने सांगितलं नाव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या