S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

चौघांच्या फक्त 435 धावा!,इंग्लंडचं कांगारूंना तब्बल 482 धावांचं टार्गेट

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2018 11:16 PM IST

चौघांच्या फक्त 435 धावा!,इंग्लंडचं कांगारूंना तब्बल 482 धावांचं टार्गेट

19 जून : आॅस्ट्रेलियाच्या विरोधात ट्रेंट ब्रिजमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात इंग्लंडने इतिहास रचलाय. इंग्लंडने पहिले फलंदाजी करत तब्बल 481 धावांचा डोंगर रचून नवा विक्रम केलाय.

इंग्लंडने एकदिवशी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक असलेल्या 444 धावांचा विक्रम मोडीत काढलाय. इंग्लंडने आॅस्ट्रेलियाच्या विरुद्ध 50 षटकात 481 धावांचा डोंगर उभा केलाय.

इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने सर्वाधिक 147 धावा कुटल्यात. तर जॉनी बेयरस्टोने 139 धावांची तुफानी शतकी खेळी केली.  तर ओपनर बेयरस्टोने 82 आणि कर्णधार ऑयन मॉर्गनने 67 धावा केल्यात.इंग्लंडने एकदिवशीय सामन्यात तिसऱ्यांदा 400 धावांचा टप्पा गाठलाय. 400 धावांवरून अधिक स्कोअर करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेनं तब्बल 6 वेळा हा विक्रम केलाय.

आॅस्ट्रेलियन टीमकडून टायने 9 षटकात तब्बल 100 धावा दिल्यात तर जाय रिचर्डसनने 3 गडी बाद करण्यासाठी 92 धावा द्यावा लागल्यात. तर मार्कस स्टोयनिसने 85 धावा दिल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 11:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close