मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : ओली रॉबिनसनवर 8 सामन्यांची बंदी, तरी भारताविरुद्ध खेळू शकणार, कारण...

IND vs ENG : ओली रॉबिनसनवर 8 सामन्यांची बंदी, तरी भारताविरुद्ध खेळू शकणार, कारण...

वादग्रस्त ट्वीट प्रकरणी क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधून निलंबित झालेल्या इंग्लंडच्या ओली रॉबिनसनचा (Ollie Robinson) पुन्हा क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 3 जुलै : वादग्रस्त ट्वीट प्रकरणी क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधून निलंबित झालेल्या इंग्लंडच्या ओली रॉबिनसनचा (Ollie Robinson) पुन्हा क्रिकेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्रिकेट अनुशासन समितीने या आठवड्यात घेतलेल्या सुनावणीनंतर रॉबिनसनचं 8 सामन्यांसाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला. रॉबिनसनवर ही बंदी घालण्यात आली असली, तरी त्याला भारताविरुद्धच्या (India vs England) सीरिजमध्ये सहभागी होता येणार आहे.

मागच्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टपासून रॉबिनसनचं निलंबन करण्यात आलं. यानंतर त्याने टी-20 ब्लास्टच्या दोन्ही मॅचमधून आपलं नाव मागे घेतलं. क्रिकेट अनुशासन समितीने या तीनही मॅचचा कारवाईमध्ये समावेश केला आहे. याचसोबत उरलेल्या 5 मॅचची कारवाई पुढची दोन वर्ष स्थगित केली आहे, त्यामुळे आता रॉबिनसन पुन्हा एकदा इंग्लंडकडून खेळू शकतो.

या कारवाईसोबतच रॉबिनसनला 3200 पाऊंड्स म्हणजेच 3.29 लाख रुपये दंडाची रक्कमही भरावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून रॉबिनसने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने एकूण 7 विकेट घेतल्या. या सामन्यानंतर रॉबिनसनची जुनी ट्वीट समोर आल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

2012 ते 2014 दरम्यान ओली रॉबिनसनने काही वर्ण द्वेषी आणि लिंगभेदी ट्वीट केली होती. या कारणामुळे या फास्ट बॉलरचं निलंबन करण्यात आलं होतं. रॉबिनसनने या प्रकरणी माफी मागितली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रॉबिनसन जेव्हा लॉर्ड्सवर उतरला तेव्हाच त्याची ही ट्वीट व्हायरल करण्यात आली. पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 75 रन देऊन 4 विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 26 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याचसोबत त्याने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना 42 रनची खेळी केली.

First published:

Tags: Cricket, India vs england