वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' गोलंदाजावर दु:खाचा डोंगर, गोळ्या झाडून झाली भावाची हत्या

वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' गोलंदाजावर दु:खाचा डोंगर, गोळ्या झाडून झाली भावाची हत्या

इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू असतानाच इंग्लंडच्या प्रमुख गोलंदाजावर दु:खाचा डोंगर कोसळता होता.

  • Share this:

लंडन, 16 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये यजमानांनी सुपरओव्हरमध्ये जग्गजेता होण्याचा बहुमान मिळवला. दरम्यान सुपरओव्हरच्या त्या सहा चेंडूचे दडपण घेतले ते इंग्लंडच्या युवा गोलंदाजाने. या गोलंदाजाचे नाव होते जोफ्रो आर्चर. दरम्यान इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू असतानाच आर्चरवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या पहिल्या सामन्यानंतर जोफ्राचा चुलत भाऊ एशेंटियो ब्लॅकमॅन याची हत्या झाली होती.

जोफ्राच्या भावाची घराबाहेरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आपल्या भावाच्या या हत्येनंतर जोफ्राच्या पायाखालची जमीनच सरकली होती. मात्र यातून सावरत त्यानं आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला. जोफ्रा आर्चर आपला चुलत भाऊ एशेंटियो ब्लॅकमॅन याच्या खूपच जवळ होता. त्यांच्यात भावापेक्षा मैत्रीचे नाते होते. त्यामुळं आपल्या भावाच्या अशा हत्येनंतर जोफ्राला मोठा धक्का बसला होता. तरी यातून सावरत त्यानं वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त निर्धाव ओव्हर टाकण्याची कामगिरी केली होती.

संपूर्ण वर्ल्ड कप आर्चर धक्क्यात खेळला

जोफ्रा आर्चर संपूर्ण वर्ल्ड कप आपल्या भावाच्या हत्येमुळं दु:खात होता. त्यानं 11 सामन्यात केवळ 20 विकेट घेतल्या. मात्र अंतिम सामन्यात जोफ्राच्या सुपरओव्हरनं इंग्लंडला जगज्जेता केले.टाईम्य या वृत्तसंस्थेशी बोलताना जोफ्राच्या बाबांनी ही माहिती दिली होती.

वाचा- वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय संघाला 'शॉक', वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठा फटका

वाचा- टी-20 वर्ल्ड कप 2020चे वेळापत्रक जाहीर, यादिवशी होणार भारताचा पहिला सामना

VIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं!

First published: July 16, 2019, 8:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading