मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ashes साठी इंग्लंड टीमची घोषणा, टॉप-3 खेळाडूंशिवाय उतरणार मैदानात!

Ashes साठी इंग्लंड टीमची घोषणा, टॉप-3 खेळाडूंशिवाय उतरणार मैदानात!

नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या ऍशेस सीरिजसाठी (The Ashes) इंग्लंडने (England Team) 17 खेळाडूंची निवड केली आहे. इंग्लंड टीमचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड (Chris Silverwood) यांनी ही घोषणा केली.

  • Published by:  Shreyas

लंडन, 10 ऑक्टोबर : नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या ऍशेस सीरिजसाठी (The Ashes) इंग्लंडने (England Team) 17 खेळाडूंची निवड केली आहे. इंग्लंड टीमचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड (Chris Silverwood) यांनी ही घोषणा केली. टी-20 वर्ल्ड कपनंतर आता ऍशेस सीरिजमध्येही बेन स्टोक्स (Ben Stokes), जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि सॅम करन (Sam Curran) यांचं नाव सामील करण्यात आलं नाही. उपलब्ध असलेल्या खेळाडूंमधले सर्वोत्तम खेळाडू आम्ही निवडले आहेत, अशी प्रतिक्रिया सिल्व्हरवूड यांनी दिली आहे. निवड झालेल्या 17 खेळाडूंपैकी 10 खेळाडू पहिल्यांदाच ऍशेस सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहेत, यामध्ये उपकर्णधार जॉस बटलरचाही समावेश आहे.

इंग्लंडचा दिग्गज फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडचा (Stuart Broad) हा चौथा ऍशेस दौरा असेल. भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजवेळी ब्रॉडला दुखापत झाली होती. पुढच्या आठवड्यात ब्रॉड इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या केंद्रात सरावाला सुरुवात करणार आहे. सॅम करनला आयपीएलदरम्यान दुखापत झाली, त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कपमध्येही खेळू शकणार नाही. स्कॅनिंगमध्ये करनच्या पाठीच्या खालच्या भागाला स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचं दिसून आलं आहे.

दुसरीकडे बेन स्टोक्स अंगठ्याची दुखापत आणि मानसिक आरोग्यामुळे क्रिकेटपासून लांबच आहे. ऑस्ट्रेलियातल्या क्वारंटाईनच्या कठोर नियमांमुळे इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी ऍशेससाठी ऑस्ट्रेलियाला जायला आक्षेप घेतले होते.

ऍशेससाठी इंग्लंडची टीम

जो रूट, जेम्स अंडरसन, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, जॅक क्रॉले, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिनसन, क्रिस वोक्स, मार्क वूड

First published: