मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सकाळी मेलबर्न दुपारी सेंच्युरियन, बॉक्सिंग डेला इंग्लंडनंतर भारतालाही 'बॉक्सर पंच'

सकाळी मेलबर्न दुपारी सेंच्युरियन, बॉक्सिंग डेला इंग्लंडनंतर भारतालाही 'बॉक्सर पंच'

बॉक्सिंग डे टेस्टच्या (Boxing Day Test) तिसऱ्या दिवशी सकाळी मेलबर्नमध्ये इंग्लंडने (Australia vs England) तर सेंच्युरियनमध्ये भारताने (India vs South Africa) लाजिरवाणी कामगिरी केली आहे.

  • Published by:  Shreyas

सेंच्युरियन, 28 डिसेंबर : बॉक्सिंग डे टेस्टच्या तिसऱ्या दिवशी सकाळी मेलबर्नमध्ये इंग्लंडने तर सेंच्युरियनमध्ये भारताने लाजिरवाणी कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने (India vs South Africa 1st Test) 272/3 अशी केली होती. केएल राहुल (KL Rahul) 122 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 रनवर खेळत होते. पण कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) यांच्या आक्रमक बॉलिंगसमोर भारताची बॅटिंग गडगडली. 55 रनमध्येच भारताने 7 विकेट गमावल्या, त्यामुळे भारताचा 327 रनवर ऑल आऊट झाला.

केएल राहुल 123 रनवर, अजिंक्य रहाणे 48 रनवर, अश्विन 4 रनवर, ऋषभ पंत 8 रनवर, शार्दुल ठाकूर 4 रनवर, मोहम्मद शमी 8 रनवर आऊट झाले. रबाडाने राहुल, अश्विन आणि शार्दुलची विकेट घेतली. तर एनगिडीला रहाणे, पंत आणि शमीची विकेट मिळाली. याचसह एनगिडीच्या मॅचमध्ये 5 विकेटही पूर्ण झाल्या. याआधी पहिल्या दिवशी त्याने मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीला माघारी पाठवलं होतं. मार्को जॅनसनने बुमराहची अखेरची विकेट घेऊन भारताचा डाव संपवला.

त्याआधी सकाळी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगसमोर इंग्लंडची (Australia vs England) बॅटिंगही अशीच गडगडली, ज्यामुळे इंग्लंडचा इनिंग आणि 14 रननी पराभव झाला. पहिल्या डावामध्ये इंग्लंडने 185 रन केल्या. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 267 रन करत 82 रनची आघाडी मिळवली. त्यामुळेच हा सामना रंगतदार होईल असे वाटले होते. पण स्कॉट बोलॅडच्या भेदक बॉलिंगमुळं इंग्लंडचा दुसऱ्या डावात 68 रनमध्ये ऑल आऊट झाला.

बोलॅडने 7 रन देऊन 6 विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्कने तीन आणि कॅमरन ग्रीनने एक विकेट घेतली. या पराभवासह इंग्लंडने ऍशेसच्या (Ashes Series) पहिल्या तिन्ही टेस्ट गमावल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाने विजयी आघाडी घेतली आहे.

First published:

Tags: Ashes, Australia, England, South africa, Team india