धोनीच्या लष्कर ट्रेनिंगची इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं केली मस्करी, झाला ट्रोल

धोनीच्या लष्कर ट्रेनिंगची इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं केली मस्करी, झाला ट्रोल

धोनी भारतीय लष्करातील पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. त्याला मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जुलै : World Cup नंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर करण्यात आला. त्यापूर्वीच भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आपण विंडीज दौऱ्यातून माघार घेत असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. त्यानंतर धोनी दोन महिने काय करणार याची चर्चा सुरू होती. तो भारतीय लष्करासोबत काम करणार असल्याचं समोर आलं. पण लष्करात धोनी नक्की काय काम करणार याबद्दल मात्र समजू शकले नव्हते.

धोनी भारतीय लष्करातील पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. त्याला मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे धोनी आता लष्करात सेवा बजावणार आहे. मात्र, धोनी लष्करात जाऊन काय करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. दरम्यान धोनीच्या या निर्णयावर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड यांनी थट्टा केली आहे. धोनीच्या या बातमीला ट्विटरवरून रिट्वीट करत मस्करी केली आहे.

स्काय स्पोर्ट्सने दिलेल्या धोनीच्या बातमीवर लॉयड यांनी हसण्याची इमोजी टाकली. त्यावर भारतीय चाहत्यांनी त्यांना फैलावर घेतले. काही चाहत्यांनी धोनीहा खरा वर्ल्ड कप विनर आहे, तुमच्यासारखा विकत घेतलेला वर्ल्ड कप नाही, असे ट्वीट केले आहे.

वाचा-आता नो-बॉलवरून होणार नाही राडा, ICCने घेतला 'हा' मोठा निर्णय!

वाचा- कधी 200 रुपयांसाठी केली टेनिस बॉलनं गोलंदाजी आता दिसणार थेट ब्लू जर्सीत!

लष्करप्रमुखांनी धोनीला दिली परवानगी

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला लष्करप्रमुखांनी सैन्यासोबत सराव करण्याची परवानगी दिली आहे. धोनी पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असल्यानं त्या रेजिमेंटमधूनच सराव करणार आहे. या रेजिमेंटचा सराव जम्मू आणि काश्मिरमध्ये होणार आहे. धोनीला सरावात भाग घेता येणार असला तरी लष्कराच्या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

वाचा- मुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट!

VIDEO : MTNL इमारतीत आग कशी लागली? बचावलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

Tags: MS Dhoni
First Published: Jul 22, 2019 05:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading