इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूनं पुन्हा केली 'NUDE' फलंदाजी, फोटो व्हायरल

सारा टेलर सध्या जगभरात सुरू असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांशी संबंधित अभियानांतर्गत काम करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 05:55 PM IST

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूनं पुन्हा केली 'NUDE' फलंदाजी, फोटो व्हायरल

लंडन, 25 ऑगस्ट : इंग्लंडची सटार महिला क्रिकेटर सारा टेलर तिच्या खेळानं मैदान गाजवते. आता मात्र तिच्या न्यूड फोटोमुळं तिची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सारानं महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृतीसाठी फोटोशूट केले होते. त्यामुळं तिचे कौतुक तर होत आहेच, त्याचबरोबर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. सारानं याआधी एक न्यूड फोटो अपलोड केला होता. आता आणखी एक फोटो सारानं टाकला आहे, यात ती अर्धनग्न होऊन फलंदाजी करताना दिसत आहे. यावर तिनं “अशी फलंदाजी करायची होती”, असे कॅप्शन लिहिले आहे.

सारा टेलर सध्या जगभरात सुरू असलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांशी संबंधित अभियानांतर्गत काम करते. तिनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिनं म्हटलं आहे की, न्यूड फोटो काढताना मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. तरीही मी या अभियानात सहभागी असल्याचा अभिमान वाटत आहे असं साराने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून तिनं नाव मागे घेतलं होतं. मानसिक तणावातून दूर होण्यासाठी सारानं काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्यण घेतला आहे. दरम्यान साराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Loading...

View this post on Instagram

 

Waiting to go into bat like ... • @womenshealthuk • #thenakedissue #womenshealthmag #portrait

A post shared by Sarah Taylor (@sjtaylor30) on

'वाचा-सानिया मिर्झानं हसन आणि सामियाला दिली अशी ट्रीट, पाहा PHOTO

साराच्या या फोटोवर इंग्लंड क्रिकेट टीमच्या आणखी एका महिला खेळाडूनं कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. इंग्लंडची खेळाडू एलेक्जेंड्रा हार्टलनं सारा टेलरच्या फोटोवर, “तु किती सामने असे नग्न अवस्थेत खेळले आहेत?”, असा सवाल केला. एवढेच नाही तर हार्टलरनं आपल्या दुसऱ्या कमेंटमध्ये, “कपडे न घालता फलंदाज करण्यासाठी तु उत्सुक आहेस असा त्याचा अर्थ आहे का?”, असाही मजेशीर प्रश्न विचारला आहे.

इंग्लंडकडून सारानं आतापर्यंत 10 कसोटी खेळल्या आहेत. यात तिला 300 धावा करता आल्या. कसोटीत तिची सर्वोच्च धावसंख्या 40 आहे. याशिवाय 126 एकदिवसीय सामने खेळताना तिनं 4 हजार 56 धावा केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 20 अर्धशतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिनं 147 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्येही तिनं 90 सामने खेळले आहेत. यात 29.02 च्या सरासरीनं 2 हजार 177 धावा केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 77 धावांची खेळी केली आहे.

यष्टीरक्षण करताना सारानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 87 झेल आणि 51 यष्टीचित केलं आहे. तर कसोटीत 18 झेल आणि दोन यष्टीचित केले आहेत. टी20मध्ये तिने 23 झेल घेताना 51 फलंदाजांना यष्टीचित केलं आहे.

वाचा-टीम इंडियातील 'या' 5 खेळाडूंना मिळतो अपेक्षेपेक्षा कमी पगार, काय आहे कारण?

‘मुलीला तिच्या शरिराचा अभिमान असायला हवा’

सारानं दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, प्रत्येक मुलीला तिच्या शरिराचा अभिमान असायला हवा. जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की हा माझा कम्फर्ट झोन नाही. तरीही मला अभिमान वाटत आहे की womenshealthuk च्या अभियानात मी सहभागी आहे. नेहमीच माझ्या शरिराच्या काही समस्या जाणवल्या आहेत. त्या सोडवण्याच्या निमित्ताने या अभियानाचा भाग होता आलं. प्रत्येक मुलगी सुंदर दिसते आणि लक्षात ठेवा प्रत्येक महिला सुंदर असते असंही सारा म्हणाली.

वाचा-निवृत्तीच्या निर्णयावर अंबाती रायडूचा यू-टर्न, 'या' दोन स्पर्धा खेळतच राहणार!

VIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2019 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...