ड्रग्ज घेतल्याप्रकरणी 'या' खेळाडूची इंग्लंड संघातून हकालपट्टी

ड्रग्ज घेतल्याप्रकरणी 'या' खेळाडूची इंग्लंड संघातून हकालपट्टी

याआधी हेल्सवर इसीबीनं 21 दिवसांची बंदी घातली होती.

  • Share this:

लंडन, 29 एप्रिल : एकीकडं सर्व संघ विश्वचषकाकरिता संघ बांधणीच्या तयारीत आहेत तर, दुसरीकडं इंग्लंड संघाचा फलंदाज एलेक्स हेल्स याची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हेल्सवर ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपावरुन याआधी केवळ 21 दिवसांची बंदी घालण्यात आली होती. मात्र आता त्याला संघातून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळं हेल्स विश्वचषक खेळु शकणार नाही. विश्वचषकाकरिता हेल्सला इंग्लंडच्या विश्वकप संघात सामिल करण्यात आलं होतं. दरम्यान, इंग्लंड बोर्डनं खेळाडूंवर वचप बसावा, यासाठी हा निर्णय घेतला. तसेच, सध्या पाकिस्तान विरोधात होत असलेल्या मालिकेमधूनही त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.

याबाबत इंग्लंड पुरुष क्रिकेटसंघाचे अध्यक्ष एश्‍ले जाईल्‍स यांनी, 'आम्ही फार विचार करुन हा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाकरिता संघात चांगलं वातावरण असणे गरजेचे आहे. त्यामुळं हा निर्णय घेतला आहे. पण हा हेल्सच्या क्रिकेट करिअरचा अंत नाही आहे. इसीबी हेल्सला आवश्यकती मदत करेल', असे स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी हेल्स क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची चर्चा होती. मात्र आता विनापरवानगी अंमली पदार्थांचं सेवन करत होता, असा आरोप आहे. हेल्स याआधी नॉटिंगमशायर संघाचा सदस्या असून, याआधीही हेल्स अनेक विवादांमुळं चर्चेत होता. याआधी त्यानं बेन स्टोक्सशी भर मैदानात राडा केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, हेल्स हेअर फॉलिकल टेस्टमध्ये नापास झाला. ही टेस्ट इंग्लंडमध्ये मालिका सुरु होण्याआधी केली जाते.

2013 साली टॉम मेनॉर्डया खेळाडूचा मृत्यूनंतर ही टेस्ट सुरु करण्यात आली. हेल्स सध्या राखीव सलामी खेळाडू म्हणून संघात सामिल करण्यात आलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हेल्सचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यानं 69 एकदिवसीय सामन्यात 6 शतक लगावले आहेत, तर 2419 धावा केल्या आहेत.

VIDEO: उमा भारतींची गळाभेट, साध्वी प्रज्ञा यांना कोसळलं रडू

First published: April 29, 2019, 4:29 PM IST

ताज्या बातम्या