Home /News /sport /

इंग्लंडची संपूर्ण क्रिकेट टीम सोशल मीडिया सोडण्याच्या तयारीत, जाणून घ्या कारण

इंग्लंडची संपूर्ण क्रिकेट टीम सोशल मीडिया सोडण्याच्या तयारीत, जाणून घ्या कारण

इंग्लंडची संपूर्ण क्रिकेट टीम (England Cricket Team) सोशल मीडिया (Social Media) सोडण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या गैरवर्तनामुळे खेळाडू नाराज झाले आहेत. इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड (Sturat Borad) याने ही माहिती दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 एप्रिल : इंग्लंडची संपूर्ण क्रिकेट टीम (England Cricket Team) सोशल मीडिया (Social Media) सोडण्याच्या तयारीत आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या गैरवर्तनामुळे खेळाडू नाराज झाले आहेत. इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड (Sturat Borad) याने ही माहिती दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अली आणि जोफ्रा आर्चर यांच्यासोबत सोशल मीडियावर गैरवर्तणूक करण्यात आली. खेळाडूंसोबत उभं राहण्यासाठी आम्ही तयार असल्याची प्रतिक्रिया स्टुअर्ट ब्रॉडने दिली. सोशल मीडियाचे बरेच फायदे आहेत, पण चुकीबद्दल उभं राहण्यासाठी जर काही काळ यापासून दूर राहायला लागलं, तर आम्ही यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असं ब्रॉड म्हणाला. 'याबाबतचा निर्णय ड्रेसिंग रूममधले वरिष्ठ खेळाडू घेतील. जर टीमला बदल करायची गरज आहे, असं वाटलं तर आमच्यावरतीही खूप मोठी लोकं आहेत, जे टीमचा विचार चांगल्या पद्धतीने समजतात. सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांसाठी हा खरच मोठा संदेश असेल', असं स्टुअर्ट ब्रॉडला वाटतं. बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी काहीच दिवसांपूर्वी मोईन अलीबाबत (Moeen Ali) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जर मोईन अली क्रिकेट खेळत नसता तर दहशतवादी संघटना आयसिसमध्ये असता, असं तस्लिमा नसरीन म्हणाल्या होत्या. तस्लिमा नसरीन यांच्या या ट्वीटवर जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) टीका केली होती. 'तू ठीक आहेस का? मला तरी तसं वाटत नाही,' असं जोफ्रा आर्चर म्हणाला. हा वाद वाढल्यानंतर तस्लिमा नसरीन यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. 'मोईन अलीबद्दलचं माझं ट्वीट उपरोधिक होतं. पण लोकांनी मला अपमानित करण्यासाठी याला मुद्दा बनवलं, कारण मी मुस्लिम समाजाला धर्मनिरपेक्ष बनवण्याचा प्रयत्न करते.' तस्लिमा नसरीन यांच्या या वक्तव्यावर जोफ्रा आर्चरने प्रतिक्रिया दिली. उपरोध? यावर कोणीही हसलं नाही. तूदेखील हसली नसशील, तू कमीतकमी हे ट्वीट डिलीट करू शकतेस, असं आर्चर म्हणाला. याशिवाय इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रेयान साईडबॉटम यानेही तस्लिमा नसरीन यांना ट्वीटर अकाउंटच डिलीट करण्याचा सल्ला दिला होता. इंग्लंडच्या फूटबॉल खेळाडूंवरही वर्णद्वेषी टीका इंग्लंड क्रिकेट टीमच्याआधी तिथल्या स्थानिक फूटबॉल क्लबचे खेळाडूही सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्याचं बोलले होते. मागच्या आठवड्यात स्कॉटिश चॅम्पियन रेंजर्स आणि इंग्लंडच्या दुसऱ्या स्तरावरची टीम स्वानसी सिटीच्या अनेक खेळाडूंनी आपण एका आठवड्यासाठी सोशल मीडियाचा बहिष्कार करणार असल्याचं सांगितलं. वर्णद्वेषी टीका होत असल्याने खेळाडूंनी हा निर्णय घेतला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या