क्रिकेट जगतातला ऐतिहासिक सामना, सलग 7 दिवस सुरु होता 'जंटलमन गेम'

क्रिकेट जगतातला ऐतिहासिक सामना, सलग 7 दिवस सुरु होता 'जंटलमन गेम'

क्रिकेटच्या इतिहासात असा सामना आतापर्यंत कधीच झाला नसल्याचा दावा संयोजकांनी केला असून सलग 168 तास न थांबता 24 खेळाडू खेळत होते.

  • Share this:

लंडन, 08 सप्टेंबर : इंग्लंडमध्ये एका क्रिकेट क्लबनं सलग क्रिकेट खेळण्याचा विश्वविक्रम केला आहे. बेडफॉर्डशरच्या एका क्लबचे खेळाडू सलग 7 दिवस क्रिकेट खेळत होते. ब्लनहाम क्रिकेट क्लबचे 24 खेळाडू न थांबता गरम वातावरण आणि पावसाची रिमझिम होत असलेल्या परिस्थितीतही खेळत राहिले. या क्लबने सलग 168 तास क्रिकेट खेळून एक विश्वविक्रम केला. त्यांच्या या कामगिरीची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी पुरावा पाठवण्यात आला आहे.

क्लबचा कर्णधार जॉर्ज हटसनने सांगितलं की, तो बऱ्याच काळापासून या विक्रमाची तयारी करत आहे. हटसनने क्रिकेटसोबतच एका फर्नीचर कंपनीत सेल्स इंजिनिअर म्हणून काम करतो. त्यानं म्हटलं की, 9 महिन्यांपासून या वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरु केले होते. यात 24 खेळाडू न थांबता 168 तास खेळण्याचा विक्रम करायचा होता. गेल्या आठवड्यात आम्हाला यामध्ये यश आलं. वाढतं तापमान आणि पाऊस या दोन्हींचा अडथळा असतानाही विश्वविक्रम केला.

विश्वविक्रम करताना खेळाडू दररोज तब्बत 21 तास मैदानावर होते. फक्त 2 तासच त्यांनी झोप घेतली. अशा प्रकारे सर्वांनी 168 तास 22 मिनिटं आणि 20 सेकंद मैदानावर खेळ केला. यानंतर सर्वांनाच खूप थकवा आला होता. पण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा एक अविस्मरणीय असा आठवडा दिसतो. त्यात आम्ही सर्वजण होतो असं कर्णधार जॉर्जनं सांगितलं.

वाचा : एका टी20 सामन्यात 7 विश्वविक्रम, रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी

एक आठवडाभर चाललेल्या या सामन्याचे सर्व पुरावे गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डला पाठवण्यात आले आहेत. याची पडताळणी केल्यानंतर विक्रमाची नोंद करण्यात येणार आहे. त्यांनी सांगितलं की, दोन्ही संघात स्पर्धा म्हणून नव्हे तर एका चॅरिटीला पैसे जमवण्यासाठी आणि क्लबसाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

दिनेश कार्तिकनं मागितली बिनशर्त माफी, BCCIने पाठवली होती नोटीस

वडिलांचं चहाचं दुकान, आई जनावरं चारते; एक डोळा अधू असतानाही क्रिकेमध्ये चमकला

SPECIAL REPORT: 'या' मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी नाही तर तिसराच पक्ष देऊ शकतो युतीला धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 8, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या