मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : भारताविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर इंग्लंडला मिळणार तीन नवे कोच!

IND vs ENG : भारताविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर इंग्लंडला मिळणार तीन नवे कोच!

भारतातल्या खेळपट्टीवर अडचणींचा सामना करणाऱ्या इंग्लंडला (India vs England) आता नवे प्रशिक्षक मिळणार आहेत. सोमवारी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) याबाबत घोषणा केली. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डावखुरा बॅट्समन मार्कस ट्रेस्कॉथिक (Marcus Trescothick) याची इंग्लंडचा बॅटिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 मार्च : भारतातल्या स्पिनरना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं आहे. भारतातल्या खेळपट्टीवर अडचणींचा सामना करणाऱ्या इंग्लंडला (India vs England) आता नवे प्रशिक्षक मिळणार आहेत. सोमवारी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) याबाबत घोषणा केली. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डावखुरा बॅट्समन मार्कस ट्रेस्कॉथिक (Marcus Trescothick) याची इंग्लंडचा बॅटिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. याचसोबत इंग्लंडने फास्ट बॉलिंग प्रशिक्षक आणि स्पिन बॉलिंग प्रशिक्षकाचीही निवड केली आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जॉन लुईसला (John Lewis) फास्ट बॉलिंग प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी ऑफ स्पिनर जीतन पटेल (Jeetan Patel) याला स्पिन बॉलिंग प्रशिक्षक म्हणून निवडलं आहे. मार्कस ट्रेस्कॉथिकने इंग्लंडसाठी दमदार कामगिरी केली आहे. ट्रेस्कॉथिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा जास्त रन केले. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ट्रेस्कॉथिक इंग्लंडच्या बॅटिंग प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारू शकतो. ट्रेस्कॉथिक समरसेटचा सहाय्यक प्रशिक्षक होता, या पदाचा त्याने राजीनामा दिला आहे.

दुसरीकडे ग्लूस्टरशरचा माजी फास्ट बॉलर जॉन लुईसला फास्ट बॉलिंग प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि जीतन पटेल इंग्लंडचा स्पिन बॉलिंग प्रशिक्षक असेल. याआधीही पटेल काही काळ इंग्लंडचा बॉलिंग प्रशिक्षक होता.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे प्रदर्शन संचालक बोबाट म्हणाले, 'इंग्लंड क्रिकेटशी एवढे चांगले खेळाडू जोडले गेल्यामुळे मी खूश आहे. मार्कस, जॉन आणि जीतन यांनी उच्च स्तरावर आपलं काम दाखवलं आहे. इंग्लंडचे फिल्डिंग प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्ससोबत ते तिघंही इंग्लंड टीमला आणखी मजबूत बनवतील.'

ट्रेस्कॉथिकसमोर अनेक अडचणी

मार्कस ट्रेस्कॉथिकसमोर बॅटिंग प्रशिक्षक म्हणून खूप आव्हानं आहेत. इंग्लंडची वनडे आणि टी-20 टीम तर शानदार आहे, पण भारतातल्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडने ज्या पद्धतीने कामगिरी केली, ते बघता ट्रेस्कॉथिकला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

First published:

Tags: Cricket, England