मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेट विश्वाला दिसला नवा धोनी, विकेट कीपिंग पाहून चाहते दंग, पाहा VIDEO

क्रिकेट विश्वाला दिसला नवा धोनी, विकेट कीपिंग पाहून चाहते दंग, पाहा VIDEO

कोरोनामुळे (Corona Virus) सध्या क्रिकेट (cricket) आणि बाकी खेळांच्या स्पर्धा बंद आहेत. तरी सध्या इंग्लंड (England) आणि वेल्समध्ये काउंटी क्रिकेट सुरू आहे. या स्पर्धेच्या मॅचमध्ये एका विकेटकीपरला (wicketkeeper) बघून चाहत्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) आठवण झाली.

पुढे वाचा ...

  लंडन, 1 जून : कोरोनामुळे (Corona Virus) सध्या क्रिकेट (cricket) आणि बाकी खेळांच्या स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना खेळांचा आनंद घेता येत नाही. मात्र, कोरोना जरी असला तरी सध्या इंग्लंड (England) आणि वेल्समध्ये काउंटी क्रिकेट सुरू आहे. या स्पर्धेच्या मॅचमध्ये एका विकेटकीपरला (wicketkeeper) बघून चाहत्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) आठवण झाली. कारणही तसंच होतं. धोनीसारखं वेगवान म्हणजे क्षणार्धात स्टंपिंग करणारा दुसरा विकेटकीपर जगात नाही. मायकल बर्गेस (Michael Burgess) याने इतकं उत्तम विकेटकीपिंग केलं की तो धोनीच आहे, असा भास चाहत्यांना काही क्षणासाठी झाला.

  27 ते 30 मे दरम्यान या स्पर्धेतील एक मॅच वॉरविकशायर आणि नॉटिंघमशायर यांच्यादरम्यान खेळली गेली. हा सामना वॉरविकशायर टीमने 170 रन्सनी जिंकला. या मॅचमध्ये वॉरविकशायरचा परफॉर्मन्स अप्रतिम होता. या टीमने पहिल्या इनिंगमध्ये 341 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 264 रन काढले. तर, नॉटिंघमशायरला पहिल्या इनिंगमध्ये 297 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 138 रन करता आले. या सामन्यात वॉरविकशायर टीमसाठी मायकल बर्गेस याने विकेटकीपिंग केली. या सामन्यात त्यानी शानदार विकेटकीपिंग करत क्षणार्धात स्टंपिग करून बॅट्समनला आउट केलं. हा क्षण पाहून क्रिकेट चाहत्यांना महेंद्र सिंग धोनीच्या वेगवान स्टंपिंगचीच आठवण झाली.

  नॉटिंघमशायरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बॅट्समॅन जॉए क्लार्कला बर्गेस काहीशा अशा पद्धतीनं स्टंप आऊट केलं की चाहते दंग झाले. बॉलर ओजे हॅनन-डाल्बीने बॅट्समॅनच्या लेग साईडला बॉल टाकला. मात्र, बॅट्समॅन तो बॉल खेळू शकला नाही, त्यामुळे बॉल विकेटकीपर बर्गेसजवळ गेला. बॉलला लेग साईडहून घेत विकेटकीपरने वेगात स्टंप केलं आणि बॅट्समनला आऊट केलं. बर्गेस याचा वेग इतका होता की बॅट्समनला देखील कळलं नाही की, विकेटकीपर इतक्या वेगाने कसं स्टंप आऊट करू शकतो. बॅट्समनने बॉल मिस केल्यानंतर त्याचे पाय क्रिजच्या आतमध्ये हवेत होते. तेव्हा अगदी काही सेकंदांत या संधीचा फायदा घेत बर्गेसने बॉलने स्टम्प उडवले.

  धोनी अगदी वीजेच्या वेगाने स्टंपिंग (Stumping) करतो. अनेकदा त्याने बॅट्समॅनला काही कळायच्या आत स्टम्प उडवलेत. असंच एकदा भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मॅचमध्ये धोनीने जॉर्ज बेलीला अवघ्या 0.09 सेकंदांत स्टम्प आऊट केलं होतं. धोनीचा वेग संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट चाहत्यांना माहीत आहे त्यामुळे सहजच त्याच्याशी तुलना केली जाते. त्यामुळे बर्गेसच्या रूपाने एक नवा धोनी सापडल्यासारखंही चाहत्यांना वाटलं.

  First published:
  top videos

   Tags: Cricket news, England, MS Dhoni