VIDEO : इंग्लंडच्या 'या' खेळाडूची चपळता पाहून धोनीही चक्रावेल, 360 डिग्रीत फिरून केलं धावबाद

VIDEO : इंग्लंडच्या 'या' खेळाडूची चपळता पाहून धोनीही चक्रावेल, 360 डिग्रीत फिरून केलं धावबाद

धोनीनं 2016च्या वन डे सामन्यात न्यूझीलंडच्या रॉस टेलरला असेच धावबाद केले होते.

  • Share this:

लीड्स, 20 मे : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या अगोदर होत असलेल्या इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत इंग्लंडने 4-0 ने विजय साजरा केला. मालिकेतील पाचवा सामना 54 धावांनी जिंकला. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील 4 सामन्यात इंग्लंडने 373, 359, 341 आणि 351 धावा केल्या. सलग 4 सामन्यात 340 पेक्षा जास्त धावा करणारा इंग्लंड हा जगातील पहिला संघ ठरला आहे.

दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं 351 धावांचे आव्हान दिले होते. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 297 धावांत माघारी परतला. हा सामना इंग्लंडनं जिंकला असला तरी, या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधलं ते इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदनं. अखेरच्या एकदिवसीय सामन्यातील 27व्या षटकात पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम आणि कर्णधार सर्फराज अहमद खेळत होते. दरम्यान, सर्फराजनं रशीदच्या गोलंदाजीवर चेंडू अगजी हलकाच टोलवला आणि मात्र सर्फराकडं न बघता बाबर रन घेण्यासाठी धावला. पण, सर्फराजनं त्याला माघारी धाडलं. याच दरम्यान, जोस बटलरनं चेंडू रशीदच्या दिशेने फेकला आणि रशीदने अश्यक्यप्राय रनआऊट केलं.

हा रनआऊट पाहून चाहत्यांना नक्कीच भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची आठवण आली, कारण धोनीनं 2016च्या वन डे सामन्यात न्यूझीलंडच्या रॉस टेलरला असेच धावबाद केले होते.

या सामन्यात चांगल्या लयीत असलेला बाबर 83 चेंडूंत 80 धावा करून माघारी परतला. तर, सर्फराजने 80 चेंडूंत 97 धावांची खेळी केली, परंतु या दोघांच्या भागीदारीनंतरही पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सनं पाकिस्तानचा निम्मा केवळ 54 धावा देत त्यांन 5 विकेट घेतल्या. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी सहज जिंकली.

वाचा- बाप मैदानावर खेळत असताना मुलीने घेतला अखेरचा श्वास

वाचा- इंग्लंडचे दोन विश्विक्रम, पाकविरुद्ध 4-0 ने मालिका विजय

EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी है, दुसरी इंदिरा गांधी है...' पाहा UNCUT मुलाखत

First published: May 20, 2019, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading