वृत्तपत्रानं छापली 30 वर्षांपूर्वीच्या हत्येची बातमी; क्रिकेटपटू म्हणाला, 'ही तर निकृष्ट दर्जाची पत्रकारिता'

बेन स्टोक्सबाबत एका ब्रिटीश वर्तमानपत्रानं छापली धक्कादायक बातमी.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 06:59 PM IST

वृत्तपत्रानं छापली 30 वर्षांपूर्वीच्या हत्येची बातमी; क्रिकेटपटू म्हणाला, 'ही तर निकृष्ट दर्जाची पत्रकारिता'

लंडन, 17 सप्टेंबर : जगभरात माहितीचे माध्यम म्हणून वर्तमानपत्रांकडे पाहिले जाते. परदेशातील काही देशांमध्ये आजही डिजीटल जगात वर्तमानपत्र आर्वजुन वाचले जातात. मात्र नुकत्याच एक प्रकारामुळं पत्रकारिता आणि वर्तमानपत्रांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. मुळात हे प्रकरण आहे गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूबाबत.

इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू बेन स्टोक्सच्या खेळीमुळं नुकतेच त्याच्या संघानं अशेस मालिकेत चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतर लगेचच एका वृत्तपत्रानं त्याच्या आयुष्यातील एक धक्कादायक सत्य सर्वांसमोर आणले. इंग्रजी वृत्तपत्र द सननं नुकताच एक दावा केला आहे यात, 1988मध्ये जन्माला आलेल्या स्टोक्सला सावत्र भाऊ आणि बहिण होते, त्यांची हत्या करण्यात आली होती. स्टोक्सची आई डेब हिच्या पहिल्या पतीनं या दोन मुलांची हत्या केली होती. त्यानंतर डेबनं गेरार्ड स्टोक्स यांच्याशी विवाह केला. दरम्यान, ही सगळी माहिती द सननं आपल्या वृत्तपत्रात छापली, यानंतर बेन स्टोक्सनं नाराजी व्यक्त केली.

स्टोक्सच्या भावा-बहिणीची झाली होती हत्या

द सन या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार रिचर्ड डन आणि स्टोक्सची आई डेब यांच्यात घटस्पोट झाला होता. त्यानंतर रिचर्ड यांनी आपल्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले होते. मात्र एकेदिवशी 8 साल वर्षांची ट्रेसी आणि 4 वर्षांच्या अंड्यु यांची गोळ्या घालून हत्या केली. दरम्यान बेन स्टोक्सनं आजपर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये कधीच या घटनेचा उल्लेख केलेला नाही.

वाचा-मिठाई तर सोडाच आता बिर्याणीही मिळणार नाही, क्रिकेटपटूंचे होणार हाल!

Loading...

द सनवर भडकला स्टोक्स

द सन या वृत्तपत्रानं ही माहिती दिल्यानंतर बेन स्टोक्स भडकला. स्टोक्सनं ही पत्रकारिता वाईट असल्याचे सांगते ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. स्टोक्सनं, “तुमच्या रिपोर्टरला माझ्या न्यूझीलंडच्या घरात पाठवून तुम्ही माझ्या वैयक्तिक जीवनातील माहिती काढली. माझ्या नावाचा वापर करत तुम्ही माझ्या आणि आई वडिलांच्या गोपनीयतेवर गदा आणली आहे. ही खुप खेदजनक गोष्ट आहे. कोणालाही हक्क नाही आहे, माझ्या वैयक्तिक आयुष्यावर टिपण्णी करावी. ही बिकाऊ पत्रकारिता आहे, तुम्ही कोणाच्या आयुष्याशी असे खेळू शकत नाही, हे खुप चुकिचे आहे”, असे ट्वीट केले आहे.

वाचा-पी.व्ही. सिंधूला मिळाली अपहरणाची धमकी, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

दरम्यान स्टोक्सनं इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019मध्ये मॅच विनरची भुमिका बजावर हातातून निसटलेल्या सामन्यात विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर अॅशेस मालिकेतही स्टोक्सनं एकहाती अनेक सामने जिंकून दिले आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल अशी माहिती प्रसिध्द केल्यामुळं क्रिकेट क्षेत्रात नाराजी पसरली आहे.

वाचा-वाद काही संपेना! LIVE सामन्यात बेन स्टोक्सनं वॉर्नरला घातल्या शिव्या

VIDEO : शरद पवारांची सोलापुरात तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ben stokes
First Published: Sep 17, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...