जोहान्सबर्ग, 25 जानेवारी : क्रिकेटचे जनक असलेल्या इंग्लंडने नवीन विक्रम केला आहे. इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा इंग्लंड पहिलाच संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यावेळी इंग्लंडने ही कामगिरी केली. नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जो रूटने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. जो रूटने इंग्लंडकडून 5 लाख धावा पूर्ण करणारी धाव काढली. इंग्लंडने 1022 व्या कसोटीत हा माइलस्टोन गाठला आहे.
इंग्लंडनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने 830 कसोटी सामन्यात 4 लाख 32 हजार 706 धावा केल्या आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने सर्वात आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
भारत मात्र याबाबतमी बराच मागे आहे. भारताने आतापर्यंत 540 कसोटी खेळल्या असून 2 लाख 73 हजार 518 धावा केल्या आहेत. भारतानंतर विंडीजचा क्रमांक लागतो. विंडीजने 545 कसोटीमध्ये 2 लाख 70 हजार 441 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सपेक्षा जास्त आहे CSKच्या खेळाडूंचा पगार, एकटा धोनी कमवतो 15 कोटी
परदेशात इंग्लंडने 500 कसोटी सामने खेळले आहेत. याबाबतीतही ते पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाने 404 सामने खेळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारत असून भारताने परदेशात 268 कसोटी सामने खेळले आहेत. यात 51 विजय आणि 113 सामन्यात पराभव झाला. तर 104 सामने अनिर्णित राहिले.
देवेंद्र फडणवीसांच्या बॉलिंगवर हार्दिक पांड्याही चक्रावला; दोनवेळा झाला बोल्ड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.