आयर्लंडची टीम अवघ्या 38 धावांमध्ये गारद, 'लॉर्डस' वर झालं नवं रेकॉर्ड!

इंग्लंड आणि आयर्लंडच्या टेस्ट मॅचमध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या इंग्लंडच्या बॉलर्सनी कमाल केली आणि आयर्लंडला केवळ 38 धावांमध्ये ऑलआउट केलं. 1955 नंतर पहिल्यांदाच कोणतीतरी टीम इतक्या कमी धावांमध्ये गारद झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 08:06 PM IST

आयर्लंडची टीम अवघ्या 38 धावांमध्ये गारद, 'लॉर्डस' वर झालं नवं रेकॉर्ड!

लंडन, 26 जुलै : इंग्लंड आणि आयर्लंडच्या टेस्ट मॅचमध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या इंग्लंडच्या बॉलर्सनी कमाल केली आणि आयर्लंडला केवळ 38 धावांमध्ये ऑलआउट केलं. इंग्लंडने आयर्लंडविरुद्धची ही टेस्ट मॅच 143 धावांनी जिंकली. 1955 नंतर पहिल्यांदाच कोणतीतरी टीम इतक्या कमी धावांमध्ये गारद झाली आहे. त्यामुळेच आयर्लंडने 92 वर्षांचं हे रेकॉर्ड तोडलं, असंच म्हणावं लागेल.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडसमोर 183 रन्सचं आव्हान होतं. पण आयर्लंडची टीम इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे पत्त्यासारखी कोसळली. आयर्लंडचा एक बॅट्समन सोडला तर कोणीही 10 चा आकडा पार करू शकलं नाही.

फेसबुकवर व्हल्गर मेसेज आला तर अशी करा तक्रार,अभिनेत्रीने केलं ट्वीट

अशीच एक घटना 1955 मध्ये घडली होती आणि तेव्हाही इंग्लंडच्या टीमसमोरच दुसऱ्या टीमने नांगी टाकली होती. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या सामन्यात न्यूझीलंडच्या टीमला केवळ 26 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर अनेक वेळा काही टीम्स कमी धावांमध्ये ऑलआउट झाल्या पण तरीही त्यांचा स्कोअर आयर्लंडपेक्षा जास्तच होता.

लॉर्डसवर झालं रेकॉर्ड !

Loading...

लॉर्डसच्या क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत झालेला हा सगळ्यात कमी स्कोअर आहे. याआधी भारतीय टीमबाबतही लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवर असंच झालं होतं. 1974 मध्ये भारताची टीम 42 धावांमध्येच गारद झाली होती. आयर्लंडचा स्कोअर तर फक्त 38 धावांवरच थांबला.

इंग्लंडच्या टीमने केवळ दीड तास आणि 15 ओव्हर्स आणि 4 बॉलमध्ये आयर्लंडच्या टीमला आउट केलं आणि आयर्लंडला लॉर्डस स्टेडियमवरून आपला गाशा गुंडाळावा लागला.

आयर्लंडच्या टीमची ही तिसरी टेस्ट मॅच होती. याआधी दोन सामन्यामध्ये या टीमला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली होती.

========================================================================================================

VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीचे हेच ते नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गुप्त बैठकीचा हा पुरावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 08:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...